Sunday, July 27, 2025

गुलसत - भाग ६


अब्बूच्या किस्स्यांची रात्रं सरून आता सकाळ झाली होती.. पक्ष्यांचा चिवचिवाट त्या शांत असलेल्या रूममध्ये, कानाकोपऱ्यात जाऊन स्वच्छंदी फिरत होता..सूर्याची किरणं खिडकीच्या फटीतून हलकच डोकावून पाहत होते की, सगळे उठलेत की नाही बरे...!! 

वातावरण तर खूप प्रसन्न झालं होतं.. कालचा थांबलेला प्रवास हेच आठवण करून देत होता की, 

आज पुन्हा एकदा नवा दिवस...!!

नवा प्रवास...!!

नवा अनुभव...!!

आणि कदाचित नव्या किस्स्याची सुरुवात होणार आहे...!!  

इतकं प्रसन्न वातावरण असूनदेखील करनची सकाळ अजून तरी झाली नव्हती.. कालच्या दिवसभराच्या प्रवासामुळे बराच थकला होता तो.. त्यात रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळचे ७ वाजून गेले तरी त्याला जाग आली नव्हती.. 

आता दिवस उजाडून बराच उशीर झाला होता. रस्त्यांवरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाजदेखील कानावर पडायला लागला होता. सगळे चाकरमानी आणि शेतकरी आपाआपल्या कामाला निघालेदेखील होते..

बैलगाडीचा आवाज आणि त्यांच्याजोडीला बैलांच्या घुंगरांचा आवाज, एका लयीत हवेत दूरवर पसरत होता..

आणि तितक्यात थोड्या वेळाने कसलीतरी कुजबुज करनच्या कानावर ऐकू येते.. डोळे चोळत तो झोपेच्या कुशीतून बाहेर येतो.. 

पण अब्बूचं मात्र तसं नव्हतं.. 

ते तर कधीच उठून अंघोळ वगैरे आटपून.. 

अंगावर काळ्या रंगाचा पठाणी सूट चढवून..

डोक्यावर हलक्या पांढऱ्या रंगावर काळ्या रंगाची नक्षीकाम असलेली गोलाकार टोपी घालून..,

मस्तपैकी तयारसुद्धा झाले होते.. अगदी टिपटॉप..!!  

करनला मात्र रात्री लवकर झोप लागली नव्हती..

अब्बूची लवस्टोरी रात्रभर त्याला स्वप्नांत येऊन छळत होती..

हिंदू मुस्लिम लवस्टोरी.. तो जुना काळ ..सर्वकाही त्याच्या डोक्यात रात्रभर गोंधळ घालत होते..

त्यामुळे झोप म्हणावी तशी नीट झाली नव्हती.. 

शरीर पूर्ण दिवसभर बाईक चालवून एकदम अकडून गेलं होतं..

अकडलेलं शरीर बसल्याजागीच लांब करून आलेली सगळी मरगळ झटकून टाकत तो अब्बूकडे प्रसन्न चेहऱ्याने बघू लागतो.. 

बाजूलाच अब्बू व्हिडिओ कॉलवर गुलसतशी बोलण्यात मग्न झाले होते..त्यामुळे त्यांचं लक्ष्य हे करनकडे नव्हतं..

तो झोपेतून उठला आहे ह्याचंही त्यांना भान नव्हतं..

मग तोच शेवटी अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनीच अब्बूला आपण उठल्याची हाजिरी देतो .. अब्बू त्यासरशी थोडे दचकून जातात.. त्यांच्या हातातला मोबाईलदेखील पडता पडता वाचतो.. 

त्यांना एवढं गोंधळलेलं बघून करन सगळी मरगळ झटकून बेडवरून उठून अब्बू जवळ जातो .. 

अब्बूच्या उजव्या हातात फोन होता..

डोळ्यांत थोडी अपराधी भावना होती..

भर थंडीतही कपाळावर दवबिंदूप्रमाणे घामाचे थेंब जमा झाले होते..

व्हिडिओ कॉल चालू होता.. गुलसत आणि अब्बू अचानक बोलता बोलता थांबले होते...

आणि हे चित्र पाहून करन आता त्यांच्या बाजूला जाऊन उभा रहातो.. तो अब्बूला काय झालं हे विचारणारच होता की, तेवढ्यात गुलसतचा मखमली हळुवार आवाज त्याच्या कानी पडतो..


( गुलसत थोडी चाचपडत करनला बोलते..)


- " अऽऽॳ.. सलामवालेकुमऽऽ .. ऽऽ..करनजी.. अब्बू को ना प्लीज गलत मत समझना.. 

उन्होंने सिर्फ मुझ से बात करने के चक्कर में ये सब किया है..!! "


( करन थोड्या गोंधळलेल्या आवाजात कपाळावर घाबरल्याची लकेर आणत विचारतो..)


- " ये सब किया है..?? मतलब..?? "


( ती आता घाबरतच त्याला सांगते..)


- " जी.. ये सब यानी के उन्होंने मुझ से बात करने के लिए आप का मोबाइल लिया है, बिना आप के इज़ाजत के..!!"


( त्याला आता प्रकरण समजलं होतं.. तरीही काही नं बोलता तो गुलसतचं बोलणं पुढं तसंच ऐकणं चालू ठेवतो. )


- " जब से आप दोनों खाना खाकर रूम पर आए हो,

तब से ही उनके फोन पर नेटवर्क नहीं आ रहा है..

वैसे तो वो आप से पूछकर ही लेना चाहते थे.."


- " पर आप सोए थे इसलिए आप को जगाना उन्हें अच्छा नहीं लगा..!!

पर बिना मुझ से बात किए उन्हें रहा भी नहीं जाता..

तो मजबूरी में उन्होंने ऐसा कदम उठाया.. 

उनकी तरफ से मैं आप से माफी मांगती हुं.."


( ती हाथ जोडून, चेहऱ्यावर एक प्रकारची अपराधी भाव आणत बोलते. )


अब्बू बिचारे तसेच नजर शरमेने खाली घालून उभे होते.. त्यांना हे अपराधी ओझं इतकं जड झालं होतं की, हातातला फोनदेखील पेलवत नव्हता...

त्यांचा हाथ फोनसकट कापायला लागला होता..

...

करनने अब्बूची ही अवस्था पटकन ओळखली. तो मुलाच्या नात्याने फोन त्यांच्या हातून अलगद स्वतःच्या हातात घेतो.. आणि अब्बूचं भार थोडं हलकं करतो.. मग त्यांचा हाथ मायेने पकडत त्यांना बेडवर आणून बसवतो. टेबलावर ठेवलेली पाण्याची बॉटल त्यांच्या हातात देऊन, त्यांच्या घशाला पडलेली कोरड तो दूर करून चोर नजरेने गुलसतकडे बघू लागतो..


काय जादू आहे यार हिच्या नजरेत.. बघताचक्षणी पार घायाळ करून टाकते..

आवाजातला गोडवा तिच्यात हरवून जाण्यास पुरेसा होता..!!

शब्दांमधला नाजूकपणा तिच्या ह्या चाचपडत बोलण्यातूनसुद्धा प्रखरतेने जाणवत होता..

तिने फक्तं बोलत रहावं आणि आपण नुसतं बेभान होऊन ऐकत रहावं.. असंच त्याला ह्याक्षणी वाटायला लागलं होतं..

पण समोर आलेली परिस्थिती ही जरा नाजूक होती.. त्यामुळे ती नीट हाताळणं जरूरी होतं.. ना त्याला अब्बूच्या व्यक्तिमत्वावर चुकीचा प्रभाव पडू द्यायचा होता आणि ना ही गुलसतला अब्बूने काही चुकीचं केलं आहे हे दाखवून द्यायचं होतं..

त्यासाठी मग तो त्याची चोर नजर सोडून आता सरळ तिच्या डोळ्यांत डोळे घालून बोलू लागतो..

इथे अब्बू बेडवर बसून ह्याच विचारात गेले होते की, 


( " करन मेरे गुनाह पर कुछ भी बोला नहीं..

उसके नजरों में गुस्से के बदले सिर्फ मेरे लिए इज़्ज़त और अदब ही दिख रही है..

इसके जगह पर अगर कोई और होता तो अब तक मुझे ना जाने कितना ज़लील कर दिया होता.." )


अब्बूचं मन त्या क्षणापाशी धावलं जेव्हा ते करनला पहिल्यांदा भेटले होते. ते तो प्रसंग आठवू लागतात जेव्हा त्यांनी करनला पहिल्यांदा त्यांची ओळख सांगितली होती ..

आधी त्यांना वाटलं होतं की, 


( यह हिंदू भारतीय लड़का.. मुझ जैसे पाकिस्तानी मुस्लिम से ज्यादा नज़दीकी नहीं रखेगा.. या फिर मुझ से गलत लहज़े में बात करेगा.. पर ये बन्दा तो सच में ही पाक साफ नियतवाला निकला.. और में कितना गलत सोच रहा था उस वक्त.. 


या अल्लाह.. मेरे गलत सोच को एक नादानी समझकर बक्श दो.. आमीन... )


ते असं बोलत हाताचे दोन्ही पंजे थोडे वर करून.. , नंतर अलगद दोन्ही डोळ्यांना लावून माफी मागतात..

ते इतका वेळ स्वतःच्या दुनियेत हरवून स्वतःलाच प्रश्न विचारत बसले होते.. तेव्हा मग तिथे करन स्वतःच्या हातात जिम्मेदारी घेत गुलसतशी बोलू लागतो .. आणि अब्बू त्यांच्या विचारांच्या दुनियेतून बाहेर येतात..)


- " नमस्ते गुलसतजी.. (करन स्वतःची खुशी शब्दांच्या आड लपवत एकदम संयमाने बोलतो.. तिला त्याचा आनंद कळू नं देता.. ) "


- " आप को माफी मांगने की कोई भी जरूरत नहीं है.. और ना ही अब्बू को..


मेरा फोन याने अब्बू का ही फोन है.. और बाप अगर बेटे का फोन इस्तेमाल कर रहा है, तो इसमें गलत क्या हुआ..?? "


( करन बोलत रहातो आणि बॉर्डरपलीकडे गुलसत ह्या व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून त्याच्याकडे भान हरपून बघत रहाते.. तिच्या वडिलांबद्दल त्याला एवढी आपुलकी आहे.. आणि एवढी इज्जत तो आपल्या वडीलांना देतोय, हे बघून तिचे डोळे आनंदाने भरून येतात... ती करनचं बोलणं तिच्या हृदयाच्या खोल कप्प्यात साठवून ठेवू लागते..) 


तिथे अब्बूचेही डोळे पाणावतात.. करनचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि आदराने त्यांना आता पूर्णपणे जिंकून घेतलं होतं. तेही त्याचं बोलणं कान लावून ऐकू लागत..


करन पुढे बोलायला लागतो..


- " अब्बूने मेरा फोन लिया इससे ही पता चल जाता है के अब्बू भी मुझे अपना मानते है.. और इससे बड़ी बात मेरे लिए तो फिलहाल कोई और हो नहीं सकती..!! "


( एवढं बोलून तो थांबतो.. तिच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे तो ही भान हरपून बघू लागतो.. दोघेही आता काही क्षणापुरते का होईना, पण एकमेकांत आता पार बंदिस्त झाले होते..काहीही नं बोलता त्यांचे डोळे आणि त्यांच्या शब्दांमागील शांतता सारं काही बोलून जात होते..)


अब्बू करनकडे बापाच्या मायेने पहात होते..


करन गुलसतला एका प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीच्या नजरेने बघत होता..


आणि.. तिथे गुलसत.., पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत करनकडे, स्वतःला त्याच्या नजरेत सोपवून निशब्द होऊन बघत होती..


तिघांमधील असलेलं हे जिवंत प्रेमाचं उदाहरण ह्या हॉटेलच्या चार भिंतीमध्ये जणू मावेनासं झालं होतं.. शब्दांच्या जागेनी कधीच भावनेची कास धरली होती..!!

कधीकधी व्यक्त व्हायला शब्द नाही, भाव लागतो..

आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे तिघे..

...

काही वेळाने तिघेही मायेच्या आणि प्रेमाच्या दुनियेतून बाहेर येतात.. अब्बू बेडवरून उठून करनजवळ येऊ लागतात..

थोड्यावेळापूर्वी एखाद्या हरलेल्या योद्ध्याप्रमाणे ते,

खांदे पाडून.. मान झुकवून गेले होते...

आणि आता मात्र येताना ... 

एखाद्या जग जिंकलेल्या शूरवीरप्रमाणे ते,

मान ताट करून.. खांदे उडवत राजेशाही थाटात येत होते..


हा बदल फक्त आणि फक्त करनच्या प्रेमाने आणि त्याने दिलेल्या आदरामुळेच शक्य झालं होतं..


अब्बू आता करनच्या खांद्यावर त्यांचा हात बापाच्या मायेने ठेवतात.. आणि दुसऱ्या हातात अभिमानाने करनचा फोन घेतात. गुलसत आणि करन त्यासरशी एकमेकांच्या नजरकैदेतून स्वतःला नाईलाजाने सोडवतात.. 


आता फोन अब्बूच्या हातात होता.. आणि ती अब्बूकडे स्मितहास्य करत थोडं लाजेने मान खाली घालते.. 


( अब्बू दुखवटा दूर सारून मस्त त्यांच्या पूर्वीच्या शैलीमध्ये.. आवाजामध्ये जोश भरून बोलतात.. )


- " अस्सलामवलेकुम गुलसत बेटा.. देखा ना आपने हिंदुस्तानी प्यार..!!

किस तरह से ये कल तक अनजान मुसाफिर आज मेरे दिल का एक अज़ीज़ हिस्सा बन गया है..

एक ऐसा हिस्सा जिसे कोई चाहकर भी जुदा नहीं कर सकता..!! "


( येवढं बोलून ते थांबतात.. त्यांचं ऊर आता प्रेमाने भरून येतं.. तिथे बाजूलाच उभा असलेला करनलाही आता आनंदाश्रू लपवता येत नव्हते.. पाणावलेले डोळे त्याच्याही नकळत वाट काढत डोळ्यांतून वाहू लागतात.. गुलसतही तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून देते.. हे सगळं दृश्यच भावनांच्या पार जाऊन पोहचलं होतं.. )

...

अब्बूच्या अभिमानाने भरलेल्या उरामधून आता शब्द भराभर बाहेर पडू पहात होते.. पण ह्या सर्व प्रकरणामुळे त्या दोघांनाही पुढचा प्रवास करायला बराच उशीर होत होता.. सकाळचे नऊ वाजत आले होते.. आणि ह्या लोकांनी साधा नाश्तासुद्धा केला नव्हता अजून .. त्यामुळे हा मुद्दा जास्त नं खेचता अब्बू थोडक्यात बोलून प्रकरण इथेच थांबण्याचा हिशोबाने बोलतात..


- " बेटा गुलसत.. अब में फोन रख देता हु.. हमे आगे का सफ़र तय करना है और मेरी वजह से पहले ही बहुत देर हो चुकी हे निकलने में.. तो हमें इजाज़त दो..


( असं बोलून अब्बू व्हिडिओ कॉल कट करायला बोट लावणार होते इतक्यात.. आधीसारखाच करन अब्बूला थांबवत गुलसतला मोठ्या उत्साहाने बोलतो..)


- " गुलसतजी.. आप फिकर ना करो.. इनकी पूरी जिम्मेदारी मेरे ऊपर में ने ली है..

आप को शिकायत का एक भी मौका में नहीं दूंगा..

और हा.. आगे जहां पर भी हम रुकेंगे, तब दोबारा आपको अब्बू व्हिडिओ कॉल जरूर करेंगे.."


अब्बूचा हा ठरलेला डायलॉग ह्यावेळी त्यांच्याआधीच तो मारून मोकळा होतो.. आणि हे बघून अब्बू आणि गुलसत मन मोकळेपणाने हसायला लागतात.. त्या दोघांना असं मनमोकळेपणाने हसताना बघून मग करन कहाणी मध्ये आणखीन एक शेवटचा डायलॉग मारतो..


- " तो फिर चलो गुलसतजी... फोन रखता हु..

अल्लाह हाफ़िज़..."


गुलसत ह्यावर आता थोडी प्रेमाने लाजते.. शरमेने तिचे गोरे गोरे गाल पार लाल झाले होते.. आणि अब्बूही करनची निरागस मस्ती बघून गालातल्या गालात हसू लागतात.. 


मग गुलसतही तिकडून लाजतंच..

नजर लाजेने अलगद झुकवत.. एक दमदार पलटवार करते..


- " अल्लाह हाफ़िज़ करनजी .. और हा राम राम..!! "


तिच्या ह्या अनपेक्षित पलटवाराने करन मात्र आनंदाने घायाळही होतो ..आणि तिच्या शब्दांनी सुखावूनही जातो.. कदाचित ती तिच्या आईकडून हे सगळं शिकली असावी.. पण जे काही का असेना.., करन तिच्या प्रत्येक शब्दांत स्वतःला आता बंदिस्त करून ठेवायला लागतो.. तेही कायमचंच...!!! 

 

( मग गुलसत पुढे तेवढ्याच निरागसपणे त्याचा आतापूरता निरोप घेऊन फोन कट करते.. )


मग करन मोबाईल बेडजवळच असलेल्या चार्जिंग पॉईंटला जाऊन लावतो... 

अब्बू जिथे उभे होते तिथेच उभं राहून.. त्याच्याकडे प्रेमाने आणि कौतुकाने डोळे भरून पहात होते..

तो मग मागे वळून.. टॉवेल वगैर घेऊन..  तसाच तडक अंघोळीसाठी बाथरूममध्ये घुसतो .. आणि जाता जाता अब्बूला ही त्यांचं सगळं सामान व्यवस्थित बॅगमध्ये भरून ठेवायला सांगतो..


...

करनने सांगितल्याप्रमाणे ते त्यांचं सामान आवरून घेतात..
तो ही थोड्यावेळातच पटकन अंघोळ आवरून बाहेर येतो..
आल्यासरशी तसाच पटकन त्याच्या बागेतून कपडे काढून घालू लागतो..
सफेद फुल हाताचा शर्ट..
त्यावर त्याचा काळ्या रंगाचा जॅकेट..
खाली हलक्या निळ्या रंगाची जीन्स पँट..
आणि कमरेला काळ्या रंगाचा बेल्ट..

त्याचा हा हिरो टाइप लूक बघून काहीवेळ अब्बूही कुतुहलाने अव्वाक होऊन बघायला लागतात..

- " क्या देख रहे हो अब्बू..?? हँडसम आदमी कभी देखा नहीं क्या..?? "

त्याच्या नेहमीच्या मस्तीखोर मिश्किल अंदाजात, तो अब्बूला डोळे मारत बोलून खळखळून हसायला लागतो.. एखाद्या निरागस मुलाप्रमाणे..
करनच्या अंदाजाने अब्बूदेखील हसू लागतात आणि त्या हॉटेलच्या रूममध्ये त्यांच्या निखळ हसण्याचा आवाज.. पाखरांच्या किलबिलाटाप्रमाणे चारी दिशेला घुमू लागतो..
अगदी आनंदी .. आणि... स्वच्छंदी..!!

दोघेही मग सर्व सामान व्यवस्थित बॅगेत भरून..
मोबाईल चार्जिंग पॉईंटला लावलेला काढून..
बाजूलाच ठेवलेली रूमची चावी घेऊन ते दोघेही टाळा लावून निघू लागतात..
पायऱ्या उतरत असताना करनला अचानक काहीतरी आठवलं.. थोडी शंका होती त्याच्या डोळ्यांत.. आणि हे अब्बूच्या चाणाक्ष नजरेने हेरलं..

- " क्या हुआ करन बेटा..?? दोबारा किस खयालों में खो गए..??
कोई सवाल अगर मन में है आप के, तो बिना देरी के पूछ लो.."

( अब्बू त्याला बोलण्यासाठी वाट मोकळी करून देण्याच्या उद्देशाने बोलतात.. तोही मग तसाच पायऱ्यांवर थांबतो आणि त्यांच्याकडे बघून निरागसपणे विचारतो..)

- " अब्बू..  मेरे फोन पर तो imo अप्लिकेशन नहीं है.. फिर आप ने गुलसतजी से किस ऐप के ज़रिए बात की..??
क्योंकि जिस वक़्त आप उनसे बात कर रहे थे ..
या फिर बाद में मैं ने जब उनसे बात की..,
तब मैं ने  ठीक से ध्यान नहीं दिया था.."

करन त्याच्या मनातली शंका अब्बूला नं दुखवता बोलून मोकळा होतो.. अब्बू त्याची शंका नीट ऐकून घेत मग तितक्याच आपुलकीने त्याला सांगू लागतात..

- " बेटा.. जब में ने आप का फोन लिया था .. तो उस वक़्त मुझे लगा.. के शायद आप के फोन में भी imo ऐप होगा..
पर जब आप के फोनपर ऐप दिखा नहीं, तब जाकर में ने आप के " व्हॉट्सअप " के ज़रिए अपनी बेटी को कॉल लगाया.."

( अब्बूचं बोलणं संपल्यावर करन लगेचच पुढचा प्रश्न त्यांना विचारतो.. ह्यावेळी शंका कुतुहलामध्ये बदलली होती..)

- " अच्छा अच्छा.. तो ये बात है.. लेकिन आप को डर नहीं लगा क्या..??

करन थोड्या दबक्या आवाजात त्यांना बोलतो.. त्यावर अब्बूला त्याला काय विचारायचं आहे हे ते ओळखून जातात.. आणि तो पुढचं बोलण्याआधीच तेच बोलतात..

- "
यही ना के, मैं ने आप के फोन पर मेरी बेटी गुलसत का नम्बर सेव किया ..
और उसे व्हिडिओ कॉल भी लगाया..
वो भी ऐसे बन्दे के फोन से, जिससे उसका अब्बू महज सिर्फ एक दिन पहले ही मिला हो .. ?? "

( करन आता शांत होतो. त्याला जे विचारायचं होतं तेच अब्बूने बरोबर सांगितलं..  त्यामुळे तो फक्त होकारार्थी मान हलवतो आणि चेहऱ्यावर थोडा आश्चर्याचा भाव आणत त्यांच्याकडे बघतो.  मग अब्बू पुढे बोलू लागतात..)

- " बेटा करन.. भले ही मैं आप से कल मिला हु..
पर मैं ने आप के अंदर एक पाक साफ इन्सान देखा है,
जिसकी फितरत बहुत ही नेक है..

( करन अब्बूचं हे बोलणं एकदम भावूक होऊन ऐकत रहातो....)

- " और आप के माँ बाप ने जो आप को तालीम दी है, उसी का असर था.. जो आप ने सुबह मेरी गलती पर भी आसानी से माफ करते हुए,
बड़ी उमदा तरीके से सब सम्भाल लिया..
ना चेहरे पर गुस्सा.. और ना ही ज़बान पर कोई गलत अल्फ़ाज़..!! "

...

अब्बू बोलता बोलताच आता पुन्हा पायऱ्या उतरू लागतात. पण, करन होता त्याच जागी पायऱ्यांवर खिळून रहातो.. त्याला काही सुचत नव्हतं.. अब्बूने जो भरवसा त्याच्यावर दाखवला होता.. तो त्याच्यासाठी खूपच भावूक क्षण आणणारा होता..

अब्बू खाली काऊंटर जवळ येतात..  रूमचं भाडं ते करनची वाट नं बघताच भरून टाकतात..
हे सगळं करत असताना त्यांची नजर पुन्हा त्या फोटोजवळ जाते. जो फोटो त्यांनी काल पाहिला होता..!! त्यांची नजर काहीक्षण त्या फोटोमध्ये हरवून जाते.. जसं की तो फोटो त्यांना स्वतःमध्ये कैद करू पाहतोय.. !!
परत ३५ वर्ष मागे घेऊन जाऊ पाहतोय..!!

करनही त्याच्या तंद्रीतून बाहेर येऊन काउंटरजवळ येऊन उभा रहातो..
अब्बूला भिंतीवर असलेल्या फोटोकडे नजर खिळवून.. त्यात स्वतःला अडकून ठेवलेलं पाहून.. तो त्यांच्या खांद्यावर हलकीच थाप देत आवाज देतो..

- " अब्बूऽऽ.. क्या हुआ..?? कहा खो गए..??

करने अचानक दिलेल्या आवाजाने अब्बू त्या फोटोच्या मायाजालातून बाहेर येतात.. आणि चाचपडत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात..

- " बेटाऽऽ.. यह वही फोटो है जिसका जिक्र मैं ने कल आप से किया था..!! "

करन एकदम उत्साहात..

- " अच्छा.. इसी फोटो की वजह से.. मुझे आप के ३५ साल पुराने यादगार पलों तक जाने का मौका मिला..
लेकिन अब्बू.. आपने जब इस फोटो का जिक्र किया था.. उस वक़्त होटल के अलावा.. बाकी फोटो के अंदर जो लोग हे उनके बारे में कुछ भी नहीं बोला था..
पर यहां तो फोटो सिर्फ होटल की ही नहीं, बल्कि उसके सामने एक औरत , एक आदमी और वो एक करीबन १६-१७  साल की लड़की भी दिखाई दे रही है.. 
ये कौन लोग है अब्बू..??
और किस्सा सुनाते वक़्त आपने होटल के साथ साथ इन लोगों का जिक्र क्यों नहीं किया..?? "

...

करनच्या डोक्यात साठलेल्या प्रश्नांनी त्याला.. शब्दांच्या मदतीने वाट मोकळी करून दिली. तो एकामागोमाग प्रश्न विचारून अब्बूकडे उत्तराच्या अपेक्षेने नजर रोखून बघत उभा रहातो..
अब्बू काहीच बोलत नाहीत.. ते त्या फोटोकडे परत एक धावती नजर टाकतात.  आणि सरळ बॅग घेऊन हॉटेलबाहेर येऊन थांबतात..
करन रूमची चावी काऊंटरवर जमा करून बिल भरायला लागतो..
तेव्हा काउंटरवर असलेली व्यक्ती,

- " बिल त्या दाढीवाल्या इसमाने आताच भरलं आहे.."

असं बोलून चावी भिंतीवर असलेल्या आकड्यात लटकवून ठेवतो ..
करन ठिक आहे बोलून भिंतीवर असलेला फोटो बघत त्या व्यक्तीला बोलतो,

- " काका.. मी तो भिंतीवर असलेला फोटो माझ्या मोबाईल मध्ये घेऊ शकतो का.?? "

( करन रिक्वेस्ट करत त्याला बोलतो. तोही जास्त भाव नं खाता फक्त मान हलवून परवानगी देऊन आपलं काम करू लागतो.. )

त्यासरशी करन पटकन मोबाईल खिशातून काढत..
त्या भिंतीवर असलेल्या फोटोला.. स्वतःच्या कॅमेरामध्ये टिपतो.. आणि आनंदाने हॉटेलबाहेर पडतो..  जसं काहीतरी मूल्यवान असा ऐवज तो स्वतः सोबत घेऊन जातोय..!!

अब्बू तसेच बाहेर उभे होते.. खोल विचारांत गेलेले.. त्यांची नजर काहीतरी सांगायचा प्रयत्न करू पहात होती.. पण त्यांचं मन सांगायला धजावत नव्हतं..
ह्याच द्विधा मनस्थितीत ते अडकले होते.. 

...

करन मागून त्यांच्याजवळ येतो..  त्यांच्या समोर जाऊन उभा रहातो..
काहीही नं बोलता अब्बूच्या डोळ्यांत डोळे घालून फक्त बघतो.. आणि त्यांच्या डोळ्यांत चटकन पाणी तरळतं..
त्यांचा गळा कोरडा पडू लागतो..
आवाजात थोडा कर्कशपणा येतो..
शब्द ओठांल्या ओठांत घोळू लागतात..
आणि शेवटी त्यांच्या तोंडून एका वाक्याच्या स्वरूपात बाहेर पडू लागतात..

- "  बेटा.. उस फोटो में जिस औरत और आदमी को आप ने देखा..
वहीं गुलसत की अम्मी के माँ बाप है..!!

त्यांचा घसा आता जास्तच सुकला होता..
त्यामुळे करन पटकन आत जाऊन पाणी घेऊन येतो.. अब्बू पाणी बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसून प्यायला लागतात.. पाणी पिण्याचा गटऽऽ गटऽऽ आवाज करनच्या कानाला जाऊन धडकत होता.. अब्बू पुढे काही बोलण्याच्या आधीच तोच त्यांना आवाजात गंभीरता आणत..थोडा थरथरत्या शब्दांनी विचारतो,

- " और जो उस फोटो में लड़की है, वो कौन है अब्बू..??
कहीं वो गुलसत की अम्मी तो नहीं है..?? "

करनच्या ह्या प्रश्नावर अब्बू एकदम शांत होतात.. आणि मग खोल आवाजात..
त्याच्या नजरेला त्यांची पाणावलेली नजर भिडवत बोलतात..

- " हा बेटाऽऽ..  सही पहचाना आप ने..
वो लड़कीऽऽ.. गुलसतऽऽ की अम्मी ही है.. !!

क्रमशः

लेखक : सतीश रमेश कांबळे

DMCA.com Protection Status

Monday, July 21, 2025

गुलसत - भाग ५


 " तो सुनो बेटा.. (इथे अब्बू दीर्घ श्वास घेतात) भलेही मैं पाकिस्तानी हु और पाकिस्तान से यहां आप के हिंदुस्तान में घूमने आया हु.. पर बेटा, अब जो में आप को बताने जा रहा हु, वो सुनने के बाद मुझे लगता है आप सदमे में जरूर चले जाओगे.." थोडं गालातल्या गालात हसत करनला डोळा मारत ते बोलतात.. 


करन अब्बूच्या अशा अनपेक्षित बोलण्याने थोडा चकित होतो. पण तरीही त्याच्या हजरजबाबी स्वभावाप्रमाणे तो जराही नं थांबता अब्बूला लगेच उत्तर देतो,


" नहीं नहीं अब्बू.. ऐसा कुछ नहीं होगा.. में इतना कमज़ोर दिल का नहीं हु.. आप बिंदास्त होकर सुनाईए.."


आणि मग पुन्हा अब्बू त्या जुन्या आठवणींना जागवत बोलू लागतात..


"मैं दरअसल इसी हिंदुस्तान में कुछ सालों पहले रहता था.. और आज जहां हम इस होटल में रुके है ना, उसी होटल में आज से करीब 35 साल पहले, लगभग देढ़-दो महीनों तक रोजाना खाना खाने आता था ..!! इसी होटल प्रभात में..!! "


एवढं बोलून ते थांबतात.. पुन्हा एक दीर्घ श्वास घेतात आणि करनकडे एक शांत नजर देऊन जाणण्याचा प्रयत्न करतात की, त्याची ह्यावर काय प्रतिक्रिया येतेय.

खरंतर अब्बूने म्हंटल्याप्रमाणे त्याला हे ऐकून खरंच धक्का बसतो.. हे काय भलतंच सांगतायत अब्बू आपल्याला.. कदाचित माझी फिरकी तर घेत नाहीयेत ना..?? की उगाच किस्सा रंगवून सांगतायत..?? अश्या ना ना तऱ्हेच्या प्रश्नांचा भडीमार त्याच्या डोक्यात सुरू होतो. अब्बूदेखील त्याच्याकडे मिश्कीलपणे बघत रहातात.. जे ते बोलले होते तेच झालं होतं. करनला बसलेल्या धक्क्याची जाणीव त्यांच्या अनुभवी नजरेतून सुटली नव्हती. आपला भूतकाळ त्याला सांगितल्यावर विश्वास येणार नाही हे ते आधीच ओळखून होते. त्यामुळे नं रहावुन शेवटी अब्बूच बोलतात,


" बेटा..आप का जो हाल अब हैं ना, उसे मै अच्छे से समझ सकता हु.. जिस तरह से आप को यकीन नहीं हों रहा है, उसका एहसास मुझे ये किस्सा सुनाने से पहले ही हो चुका था.. पर शायद मुझे लगा के अपने अब्बू की कही गई बातों पार आप को यकीन जरूर होगा.. पर कोई बात नहीं करन बेटा.. मेरी बात भी तो कोई आम नहीं है..!! "


अब्बू धीर गंभीर अशा शांत आवाजात बोलतात. करन त्यासरशी पटकन स्वतःला बसलेल्या धक्क्यातून बाहेर काढत अब्बूला त्याला समजवायचं होतं की, मला तुमच्यावर भरवसा आहे. पण काही गोष्टी ह्या अश्या असतात, ज्या की भरवसा करूनही, भरवशाच्या पलीकडच्या वाटू लागतात.. आणि मग हेच सगळं पुढे तो अब्बूला सांगू लागतो,


 " अब्बू.. मुझे गलत मत समझना। पर ऐसे अचानक आप ने जो भी बोला के, मै हिंदुस्तान में पहले रहता था, और इसी प्रभात होटल में ३५ साल पहले आप खाना भी खाते थे.. तो इसी वजह से मुझे ये बात पचाने में थोड़ासा वक्त लगा। क्योंकि थोड़ी देर पहले तक तो मुझे यही पता था के, आप पाकिस्तानी हो और यहां हिंदुस्तान में सर्फ घूमने आए हो। पर अब तो सारा माहौल ही बदल गया है, अब्बू.." 


करनचं बोलणं ऐकून मात्र अब्बू दिलखुलासपणे हसू लागतात. पण करनच्या बोलण्यात आता मात्र कमालीचा गंभीरपणा आला होता. तो हे ही दाखवू पहात होता की, मी कसाबसा हा धक्का पचवला आहे. फक्त आता तुम्ही अजून नवीन धक्का इतक्यात तरी देऊ नका.. बाकी जे समजायचं ते समजा.. 


करनचं मनातल्या मनात पुटपुटनं चालू होतं. त्यादरम्यान अब्बू बेडवरून उठतात. करनला वाटलं की अब्बू आता किस्सा पुढे सांगणार नाही किंवा त्यांची सांगण्याची इच्छा नसेल. पण त्याला जे वाटत होतं तसं काहीच नव्हतं अब्बूच्या मनात. ते तर बिचारे एवढा वेळ एकाच जागी मांडी घालून बसल्यामुळे थोडा पायांना आलेली मरगळ, चालून मोकळं करण्यासाठी उठतात. करन त्यांच्याकडे एकटक बघत असतो. अब्बू आता रुमभर फेऱ्या मारायला लागतात.. अधूनमधून करनकडे नजर टाकत राहतात.. त्याचीही नजर त्यांच्याकडेच लागून होती. 


रात्रं बरीच झाली होती. हॉटेल रूमवर पूर्ण चिडीचूप शांतता होती.. हवेत मस्त गारवा भरला होता.. त्यामुळे रूममधील पंखाही त्या दोघांनी बंद ठेवला होता.. अब्बूचं एव्हाना पाय मोकळा करून झालं होतं. परत आपल्या जागी जाण्याआधी ते बाथरूमला जाऊन येतात. बेडच्याच बाजूला असलेल्या स्टूलवरची पाण्याची बॉटल ते घेतात, आणि बोलून सुखलेल्या घश्याला पाण्याचा ओलावा देऊन, पुन्हा बेडवर येऊन मांडी घालून बसतात. करन एवढा वेळ तसाच बसून होता. त्याने फक्त बेडवरच पाय लांब करून थोडा पायांना आराम दिला होता. पण आता अब्बू परत किस्स्याला सुरुवात करणार आहे हे बघून, तो परत मांडी घालून त्यांच्याकडे पुढचं ऐकण्यासाठी बघू लागतो. अब्बू शांततलेला भंग करत पुढे प्रेमळ आवाजात मंद स्वरात बोलू लागतात,


" तो आप के हिसाब से बेटा आप मेरी बातों पर दिल से तो भरोसा कर पा रहे हो, पर आप का दिमाग अभी भी मेरी बातों को मान ने से मुकर रहा है.. सही ना..?? " 


अब्बू करनकडे चेहऱ्यावर स्मितहास्य आणत विचारतात.. तो ही नुसती होकारार्थी मान हलवून पुढचं बोलणं कान देऊन ऐकायला सज्ज होतो..

अब्बू पुन्हा किस्स्याला सुरुवात करू लागतात.. आणि करनकडे बघत बोलतात,


" बेटा.. जो भी मैं ने कहा हैं और जो भी मैं अब बताने जा रहा हु, उसमें से इक इक अल्फ़ाज़ मेरी इबादत की तरह सच्ची और पाक है.. इसी होटल प्रभात में मैं ३५ साल पहले आ चुका हु.. पर उस वक्त ये होटल सिर्फ इक आम सी दिखनेवाली छोटीसी खाने की जगह थी.. जिसमें सिर्फ कुछ गिने चुने बैठने के लिए टूटी फूटी खुर्चियाँ थी.. उस दौरान में यहां झुणका भाकर बहुत शौक से खाने आता था.."


अब्बूच्या एवढं बोलण्याने करन थोडा चमकतो आणि मनातल्या मनात परत त्याची विचारांची गाडी सुरू होते.. चला..थोडाफार का होईना आपल्याला अंदाजा तरी आला आहे मूळ झुणका भाकरीच्या ऑर्डरमागचा.. मग ह्याच ऐटीत तो विचारांतून बाहेर येत उत्साहाने अब्बूला बोलतो,


" अच्छा अच्छा.. तो ये बात है.. तभी में सोच रहा था के, आप को हमारे महाराष्ट्र के इस झुणका भाकर के बारे में कैसे पता चला.. पहले तो में मुझे लगा के शायद यूट्यूब के विडियोज देखकर आप को पता चल गया होगा.. पर अब सारा मामला साफ होते जा रहा है.." 


करनच्या बोलण्यातला उस्ताह आणि पुढे जाणून घेण्याची आतुरता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.. रूममच्या बाहेरील वातावरण जरी शांत होतं तरी आतलं मात्र सुरू असलेला रंगतदार किस्सा.., तो ऐकून घेण्यासाठी उतावळा असलेला करन.. आणि तेवढ्याच आपुलकीने स्वतःच्या भूतकाळातील आठवणींपैकी असा एका आठवणीचा किस्सा, करनला सांगत असताना स्वतःही त्यात रमलेले अब्बू.. ह्यामुळे रूममधील सारं चित्रच ३५ वर्ष मागे टाईम ट्रॅव्हल करून गेलं होतं.. एखाद्या हॉलिवूडच्या कथेप्रमाणे.. 


करनचं बोलणं ऐकून घेतल्यावर अब्बू त्याला बोलतात,


" जी बेटा.. अब जाकर सही समझे हो.. हम दोनों जब शाम के वक्त यहां आए थे तब में ने नाम तो पढ़ लिया था इस होटल का.. और ये गांव भी जरा जाना पहचाना लग रहा था.. पर इतने सालों बाद ये जगह बहुत ही बदल गई हैं.. में तो बुड्ढा हो गया हु, पर ये जगह और ख़ासतौर पर यह होटल जवान हो गए है.. और इसी वजह से में पहचान नहीं पाया.. पर जब आप फोनपर बात कर रहे है थे, उस वक्त में ऑर्डर देने गया था। तभी में ने वहां दीवार पर इस होटल की पुरानीवाली तस्वीर देख ली थी.. सच कह रहा हु में, देखकर दिल को इतना सुकून मिला बेटा.. जैसे लगा के बिछड़ा हुआ दिल का टुकड़ा दोबारा मेरे दिल से जाकर जुड़ गया हो.. (अब्बूचे डोळे इथे भरून येतात. त्यांचा आवाज जड होतो. थोड्या जुन्या आठवणींनी पाणावलेले डोळे ते रुमालाने अलगद टिपून घेत बोलू लागतात..) ये जो एहसास है न बेटा, ऐसे अल्फाजों में बताना मुश्किल होता है.. पर फिर भी में कोशिश जरूर करूंगा जिससे आप को भी इसकी गहराई का अंदाजा आ सके.. इस होटल का और मेरा रिश्ता बहुत ही गहरा है.. इसी जगह पर मेरी जिन्दगी इक हसीन पल को जा मिली थी.. गुलसत की अम्मी से..!! उसकी माॅं से..!! 


ह्या अनपेक्षित वळणाने करन तर आनंदाने पार भारावून जातो.. त्याला स्वतःची झालेली अवस्था शब्दांत मांडायला अवघड जात होतं... त्यामुळे काहीही नं बोलता हा गोड क्षण तो भरून पावल्यागत स्वतःच्या डोळ्यांत साठवून घेत होता.. गुलसतच्या आईशी हे हॉटेल आणि हे गाव जोडलं गेलं आहे, हे ऐकूनच तो पार भारावून जातो.. कारण कुठेतरी नकळत तोसुद्धा आधीच गुलसतशी जोडला गेला होता.. त्याचं हृदय तिच्यासाठी त्याच्या नकळत धडकायला लागलं होतं.. त्यामुळेच की काय तिची अम्मी त्याला त्याची सासू असल्यासमान भासायला लागली होती.. 


तसं हे गाव जेजुरी जवळचं गुळुंचे.. आणि योगायोग म्हणजे हे गाव करनचं होतं.. जेव्हा तो प्रवासाला निघाला होता, तेव्हा मनात गावी जायचं काही ठरवलं नव्हतं.. पण निव्हळ योगायोगच म्हणा हवंतर, त्याच्याही नकळत तो स्वतःच्याच गावी येऊन पोहचला होता.. वा त्याला नियतीनेच हे सारं घडवून आणण्यासाठी इथे यायला भाग पाडलं असावं..?? तसं त्याच्या पनजोबांनी त्यांच्या तरुणपणीच पाण्याच्या आभावामुळे गाव सोडून मुंबईमध्ये स्थायिक झाले होते.. ते जोपर्यंत जिवंत होते, तोपर्यंत वरचेवर गावी येऊन जाऊन होते.. त्यांच्या मृत्यूनंतर त्याचे आजोबा हळूहळू गावापासून दुरावा ठेवत गेले.. आणि नंतर त्याच्या वडिलांपासून गावी येणं जवळजवळ बंदच झालं होतं.. 


मग आताच काही वर्षांपासून तो आणि त्याचा मोठा भाऊ दरवर्षी जत्रेच्या बहाण्याने गावी येऊ लागले होते. पण त्यांचं आता ओळखीचं गावी कोणीच नव्हतं आणि जी त्यांची जागा होती त्यावर जवळजवळ ६० वर्षांपूर्वीच गावातीलच कोणीतरी जागा हडप केली होती. त्यामुळे ह्या भानगडीत करन आणि त्याचा परिवार नंतर पडले नाही.. आणि दरवर्षी जेव्हाही गावी जत्रेला येणं होतं, त्यावेळेस ह्याच प्रभात हॉटेलमध्ये ते दोघे भाव वास्तव्यास उतरतात... आणि त्यासाठी करनने आज रात्रीच्या मुक्कामासाठी हे हॉटेल निवडलं होतं.. त्याने हे अब्बूला सांगितलं नाही. कारण त्यावेळेस त्याचं आणि अब्बूचं नातं एवढं तरी घट्ट झालं नव्हतं..त्यामुळे सर्व सविस्तर सांगण्यास त्याला रस वाटला नव्हता..


किती ना हा योगायोग..!! जेव्हा नियती काहीतरी अशक्यप्राय घडवून आणायचं ठरवते ना, तेव्हा असं काही तरी योगायोग घडायला सुरुवात होते.. आणि ह्याच कारणामुळे की काय, ह्या किस्स्याशी करन इतका आता स्वतःला जोडून पहात होता.. हे सगळं कसं एखाद्या सिनेमाला शोभेल असंच वाटत होतं.. 


तर एवढी सारी विचारांची कालवाकालव झाल्यावर किस्सा पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी करन अब्बूला थोड्या अदबीने विचारतो,


" अब्बू.. फिर आगे गुलसत की अम्मी से मिलने के बाद क्या हुआ..?? आप की कहानी आगे कैसे बढ़ी..?? जरा मुझे भी बताइए ना आप ने उनको कैसे पटाया..?? ( करन ईथे अब्बूला डोळा मारत हसत बोलतो..)


अब्बू पुढे सांगू लागतात.. ह्यावेळी ते थोड्या रोमँटिक मूडमध्ये येऊन , आपल्या आवाजाला थोडं मिश्किल करून त्याच दिलफेक अंदाजात करनकडे बघून बोलतात,


" आप को क्या लगा बेटा.. जवानी से ही में बुड्ढा हु क्या..?? (असं बोलून ते हसायला लागतात..)


" अरे बेटा.. गुलसत की अम्मी जब होटल में होती थी, उस वक्त वो हमेशा मुझे इक भाकर ज्यादा ही दिया करती थी.. क्योंकि उन्हें भी पता था के इस बंदे के पास ज्यादा पैसे नहीं है.. शुरुआत में तो मुझे ये बात समझ नहीं आयी.. पर धीरे धीरे में समझ गया के ये मोहतरमा मुझसे इश्क करने लगी है..!! पर बेटा..(आवाजात थोडा गंभीरपणा आणत.. थोडं थांबत..शब्दांना आवरत ते बोलतात) जैसे जैसे हमारा प्यार आगे बढ़ता गया उनके वालिदसाहब के नजरों में आ गया और फिर गुलसत की अम्मी का आना धीरे धीरे बंद हो गया.. 


अब्बू पुन्हा दीर्घ श्वास घेऊन थांबतात. करन अब्बूची ही अवस्था बघून थोडा पुढे सरकत अब्बूच्या खांद्यावरून हाथ फिरवतो.. अब्बू भानावर येतात आणि पुढे बोलू लागतात,


" कुछ दिनों तक बेटा में ने जैसे तैसे इंतज़ार कर लिया.. पर फिर वो दिन भी आया जब इंतज़ार सजा बनने लगी और दिल बगावत पर उतर आया.. (आता त्यांच्या आवाजात कमालीचा जोश आला होता.. करनही ऐकण्यात पार रमून गेला होता..) 

मैं गुलसत के अम्मी के घर गया.. तब उनके घर में कोई नहीं था.. क्योंकि उस वक्त उनके अम्मी और अब्बू होटल पर गए थे.. उन्हें कोई भाई बहन नहीं थे.. अम्मी, अब्बू और सिर्फ वो, ऐसे तीन लोग ही घर में रहते थे। तो इसी वक्त में मैं उनसे मिलने गया था .. वो भी शायद इसी भरोसे में बैठे थे कि उनका प्यार उनसे मिलने जरूर आएगा.. तो मुझे सामने देखकर वो बहुत खुश हो गए.. थोड़ी देर नजरों से इक दूसरे से जी भर के बात करने के बाद मैं ने उनसे मेरे साथ चलने बोला.. ( करन आता डोळे विस्फारून ऐकू लागतो..)

और वो भी बिना देरी किए मेरे साथ निकल पड़े..!! शायद उन्हें उनके प्यार पर खुद से भी ज्यादा भरोसा था..



असं पळून जाणं त्याला योग्य वाटलं नाही. त्यामुळे अब्बूला मध्येच थांबवत तो बोलतो,


"अब्बू.. आप चाहते तो उनके अब्बू से उनकी लड़की का हाथ मांग सकते थे ना..?? बिना उनके अब्बू से शादी की बात किए बिना ऐसे भगाकर लेकर जाना क्या सही था..?? ( करन थोड्या गंभीर आवाजात बोलतो..)


अब्बू करनच्या दिशेने एक शांत पण गहरी नजर टाकत बोलतात,


" मैं इस वजह से उन्हें भगाकर लेकर गया, क्योंकि बेटा.. गुलसत की अम्मी हिन्दू थी और मैं मुसलमान..!!

उनका नाम था गुलाबाई और मेरा नाम सतीमुद्दीन..और हम दोनों का नाम जोड़कर ही हमारे बेटी का नाम गुलसत रखा है..!!


अरे बापरे.. करन तर आता पारच हादरून गेला. हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा.. येवढं धाडस तर आजही करता येणं अवघड आहे.. आणि ह्यांनी तर ३५ वर्षांपूर्वीच करून झालंय.. करन पार निशब्द होऊन जातो.. त्याचे विस्फारलेले डोळे आणि अव्वाक होऊन उघडं पडलेलं तोंड त्याला बसलेला धक्का केवढा मोठा होता हे सांगण्यास पुरेसं होतं.. गुलाबाई चा Gul आणि सतीमुद्दिनचं Sat.. अच्छा तर असं ठेवलं गेलं होतं गुलसतचं नाव..!! करन गुलसतच्या नावामागील बनण्याचा किस्सा तर ऐकून खुश होता पर अब्बूची ही फिल्मी स्टाईल खतरनाक लव स्टोरी ऐकून तेवढाच शॉकमध्येसुद्धा गेला होता.


काही वेळ अशीच भयाण शांतता रुमभर पसरते.. रात्रं ही बरीच झाली होती.. सकाळी लवकर उठून पुढचा प्रवासदेखील करायचा होता.. आणि आज सकाळपासून प्रवास करून अब्बूचं शरीरदेखील थोडं थकलं होतं.. त्यामुळे अब्बू निमूटपणे काहीही नं बोलता शांतपणे झोपी जातात.. आणि करन तसाच ह्या किस्स्याच्या खोल तळात जाऊन तसाच बेडवर बसून राहतो.. शांत..निशब्द आणि खोल विचारात हरवून गेलेला.. 


आणि शेवटी थकलेलं त्याचंही शरीर पाठ बेडवर टेकवून आपोआपच शांत झोपी जातं ....


क्रमशः 

सतिश रमेश कांबळे 

DMCA.com Protection Status

Saturday, July 19, 2025

गुलसत - भाग ४



 तेवढ्यात दोघांची एकमेकांत हरवलेल्या नजरेला भानावर आणत अंकल गुलसतला प्रेमाने बोलतात,


अंकल : " बेटा गुलसत.. शायद अब राहत मिल गई होगी तुम्हें, मुझे ऐसे सही सलामत देखकर..!! तो अब बेटा, ज्यादा सोचो मत और खाना खाकर सो जाओ.. में अब सीधे कल सुबह में ही कॉल करूंगा.."


आणि एवढं बोलून अंकल व्हिडिओ कॉल कट करणारच होते की, तेवढ्यात करन हिरोगत एन्ट्री मारत मध्येच त्यांना थांबवत बोलतो ..,


" आप टेंशन मत लो.. आप के अब्बू अब मेरे साथ सही सलामत है.. उनको कुछ होने नहीं दूंगा में..!! "



त्याची ही स्टाईल थोडी फिल्मी किंवा नोटंकीवाली जरी वाटत असली तरी, त्याच्या बोलण्यात आता आपुलकी जाणवत होती गुलसतबद्दल..आणि हे गुलसत सोबतच तिच्या वडिलांनाही जाणवलं होतं.. त्यामुळे वेळेचं भान ठेवून गुलसत फक्तं " जी शुक्रियाँ.. " बोलून कॉल कट करते.. त्यासरशी करन गुलसतच्या तंद्रीतून बाहेर येतो आणि अंकलकडे थोड्या शरमेनेच बघत, बैचेन होऊन उभा राहतो.. त्यालाही एव्हाना कळून चुकलं होतं की, आपण असं ह्या बाप-लेकीच्या मध्ये बोलायला नको होतं.. त्याच्या स्वतःच्याच असं वागण्यामुळे आता अपराधी भावना त्याच्या मनामधे येऊ लागली होती...आणि ह्यातच तो मग मान खाली झुकवून अंकलची माफी मागायला लागतो..पण, ते त्याला अर्ध्यातच थांबवत माफी मागण्यापासून अडवतात..


" अरे करन बेटा.., आप बेफ़ुझूल ही माफी के चक्कर में पड़ रहे हो..आप ने कुछ भी गलत नहीं किया है, और ना मैं नाराज़ हूँ.. असल में, मैं तो आप के जिम्मेदारी भरे इस अंदाज़ से और अल्फ़ाज़ से इससे पहले वाक़िफ नहीं था.. तो कुछ देर के लिए मैं होश ही खो बैठा था के, इक अंजान लड़का.., इक पाकिस्तान से आएं हुए बूढ़े आदमी की, कितने अपनेपन से जिम्मेदारी उठा रहा है.."


अंकल करनचं कौतुक करण्यात पुढे काही वेळ दंग होऊन जातात.. शेवटी तोच त्यांना थांबवत खुर्चीवर नेवून बसवतो आणि स्वतःही त्यांच्या समोरच्याच खुर्चीवर जाऊन बसतो.. दोघांच्या मधोमध हॉटेलचा टेबल होता.. इतक्यातच अंकलने दिलेली ऑर्डर वेटर घेऊन येतो. पण, त्या ऑर्डर केलेल्या थाळीवर करनची नजर खिळून राहते.. त्याला थाळीतलं जेवण बघून काय बोलावं हे काहीच सुचत नव्हतं. त्याच्या मनाची झालेली ही चलबिचल अंकल बरोबर ओळखतात. त्यासाठी त्याची ही झालेली अवस्था दूर करण्यासाठी ते बोलतात..,


" अरे करन बेटा..ज्यादा न सोचो.. तुम जो देख रहे हो ऐसे ही दिया हुआ खाने का ऑर्डर नहीं है.. में ने कहा था ना आप से के, आप के हिंदुस्तान से मेरा 35 साल पुराना रिश्ता है.. और इसी वज़ह से आज जो में ने खाना ऑर्डर किया है, वो भी इसी मिट्टी से जुड़ा हुआ है..!! जैसे राइस प्लेट और ये खास झुणका भाकर..!! क्योंकि बेटा, मेरा वास्ता भी आप के महाराष्ट्र से है..!! जिसकी कहानी के पन्ने में इस सफ़र के दौरान धीरे धीरे खोलते जाऊंगा.. जिस से पन्ने बिना फटे अपनी कहानी अपने आप ही तुम्हारे सामने उजागर करते जाए.. तो अब बिस्मिल्लाह करे..?? "


करनला तर काही समजलंच नाही. बिस्मिल्लाह करे म्हणजे नक्की काय करायचं ह्यामधेच तो पुरता गोंधळून गेला होता. त्याचा झालेला गोंधळ दूर करण्याच्या हेतूने अंकल त्याला बोलतात..,


" करन बेटा.. हमारे मज़हब में बिस्मिल्लाह हर नेक काम करने से पहले बोला जाता है.. जैसे आप में बोला जाता है श्री गणेशा करो..!! "


आता मात्र करन अंकलच्या हा वाक्याने करंट लागल्यागत तसाच तडक खुर्चीवरून उठतो आणि अंकलकडे बघत विचारतो..,


" अंकल.. आप को इतना सब पता है.. ये मेरे लिए अब हज़म करना सच में मुश्किल होते जा रहा है.. आप मुस्लिम हो, ऊपर से पाकिस्तानी हो और फिर भी आप को श्री गणेशावाली बात पता है..!! ये जरा मेरे दिमाग के अंदर गड़बड़ कर रहा है.. प्लीज.. आप भले ही अभी आपकी 35 साल पहले की पूरी स्टोरी मत बताओ..पर, कम से कम उस स्टोरी का कुछ किस्सा तो बता ही सकते हो ना..?? जिससे मुझे ये सब पचाने आसानी हों.."


करनचं बोलणं ऐकून मात्र अंकलला हसू आवरलं नाही.. बेचारा त्याचा चेहरा एखाद्या लहानमूलागत झाला होता.. त्यामुळे त्याची ही प्रामाणिक आणि सच्ची भावना समजून घेऊन अंकल त्याला, त्या कहाणीची एक छोटीसी खिडकी त्याच्यासमोर उघडायचं ठरवतो. 


" बेटा.. में जरूर बताऊंगा तुम्हें.. पर खाना खाने के बाद जब हम रूम के जाएंगे, तभी.. क्योंकि बेटा खाना खाते समय बाते करना अच्छा नहीं होता है..और आप भी खाते समय बात किया ना करो.."


अंकल छोटासा का होईना पण किस्सा तरी निदान सांगायला तयार झालेत.. ह्या विचारानेच करन भलताच खुश होतो.. आणि अंकलकडे चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटवत, एखाद्या ऊत्साही लहामुलावाणी बघायला लागतो. पण, जेवून झाल्यावर सांगण्याचं बोलल्यामुळे तो त्यांच्या शब्दांचा मान ठेवत काहीही नं बोलता, स्वतःचा उत्साह कंट्रोल करत फक्तं नजरेने होकारार्थी मान हलवतो आणि पुढ्यात ठेवलेलं जेवण निपूठपणे जेवायला सुरुवात करतो..


दोघांचं जेवण आता आवरत आलं होतं.. थंडी जस जशी रात्रं पुढे सरकत होती.., तस तशी जरा जास्तच अंगाला झोंबत होती.. काहीवेळातच दोघांचंही जेवण झालं आणि करन बिल भरायला जाणार त्याआधीच, हाथ धुवायच्या बहाण्याने अंकल जाऊन बिल भरून येतात. अंकलने बिल भरलेलं करनला आवडलं नाही. तो नाराजीच्या स्वरातच अंकलला बोलतो..,


" क्या अंकल आप भी.. बिल क्यों भरा आप ने..?? आप हमारे देश के मेहमान हो.. आप का ख़्याल रखने की ज़िम्मेदारी में ने ली है.. और में ने आप की बेटी को भी वैसे बोल दिया था. तो फिर क्यों आप ने बिल भरा..?? "


करनच्या एवढ्या लांबलचक नाराजीने भरलेल्या पण, तेवढ्याच आपुलकीची किनार असलेल्या शब्दांच्या सुखद माऱ्याने, स्वतःला सावरत अंकल बोलतात,


" करन बेटा.. अगर आप की जगह मेरा बेटा होता, तो क्या में उसका पैसों का नुकसान होने देता..?? तो वहीं सोचकर में ने इक बाप के नाते, सिर्फ खाने का बिल ही तो चुकाया है.. उसमें कौनसी बड़ी बात हो गई बेटा.."

करन अंकलचं बोलणं ऐकून खूप इमोशनल होतो. त्याच्या डोळ्यांत नकळत पाणी साचायला लागतं.. काही सेकंद तसाच स्तब्ध उभा रहात तो अचानक अंकलला येऊन घट्ट मिठी मारतो..!! ह्यावर अंकलला ही भरून येतं.. दोघेही मग बाप लेकाच्या नात्याने एकमेकांना काही वेळ तसंच मिठीत कवटाळून पुन्हा स्वतःला भानावर आणतात.. काही आजूबाजूचे जेवणासाठी बसलेली मंडळी त्या दोघांकडे आपुलकीने बघतात.. काहींना तर भरून येतं तो नात्याने घट्ट विणलेला नजारा डोळ्यांदेखत बघत.. कारण, आताच्या घडीला इथे मुलाला बापाकडे साधं ढुंकूनही बघण्याचा वेळ नसतो. पण, इथे तर हे दोघे बाप लेक असे एकमेकांना मायेच्या घट्ट मिठीत कैद करतायेत, हे बघून बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर आपसुकच आनंदाची हलकीशी लकेर उमटते..   


करन जरा जास्तच इमोशनल झाला आहे हे बघून अंकल भारी झालेलं वातावरण, थोडं हलकं करण्यासाठी मुद्दामहून त्याची मस्करी करत बोलतात,


" करन बेटा.. पर हर बार नहीं भरूंगा हा में पैसे.. अब ये भला अच्छा नहीं लगता ना.. के बेटा साथ होकर भी बाप हर बार पैसे भरे.."



असं बोलून अंकल हसायला लागतो.. करनही अंकलच्या बोलण्याने थोडा नॉर्मल होत हलकासा हसत बोलतो,


" ठीक हैं अंकल.. जैसा आप को सही लगे.. पर क्या में आप को अब से 'अब्बू' कह कर बोल सकता हूं..?? क्योंकि आप ने जिस तरह मुझे बेटा मानकर भलेही इक बिल भरा हो, पर इतनीसी बात भी मेरे लिए बहुत मायने रखती है.. और जिस कदर आपने ने मुझे बाप के नाते गले से लगाया, उसके बाद तो अब आप को अंकल बोलना मेरे लिए किसी गाली बराबर ही होगा.. मेरी जबान आप को अंकल बुलाने की इजाज़त अब से नहीं दे पाएगी..!! "


एवढं सारं बोलून करनच्या डोळ्यांत पुन्हा पाणी येतं.. करन सारखा बिनधास्त, स्वतःच्या दुनियेत हरवलेला आनंदी मुलगा, असा इमोशनल असेल असं अंकलला अजिबात वाटलं नव्हतं.. करनच्या एवढ्या मायेने भरलेल्या प्रेमामुळे अंकलकडे त्याला नकार देण्याचं काही कारणच नव्हतं.. त्यामुळे त्यांनीही जराही वेळ नं दडवता, करनच्या डोक्यावरून मायेने हाथ फिरवत आनंदाने होकारार्थी मान हलवतात .. आणि अशाप्रकारे त्या दोघांच्यात, बाप लेकाची एक नव्या नात्याची मायेची वीण घट्ट विणली जाते..!!


हा इमोशनल फॅमिली ड्रामा थोडा वेळ असाच चालू राहिला होता. आजुबाजूची मंडळीही आता जेवून आपआपल्या दिशेने निघून गेली होती.. आसपास त्या दोघांव्यतिरिक्त आता फक्त हॉटेलचा स्टाफ होता आणि सोबतीला ही मायेच्या थंडीने भरलेली रात्रं..!! त्यामुळे ते दोघेही रूमवर जायला निघतात.. करनच्या डोक्यात जाताना पुन्हा अब्बू जो किस्सा सांगणार आहेत, त्याच्या नुसत्या विचारानेच उत्साह पूर्ण चेहऱ्यावरून वाहायला लागतो.. अब्बूला करनची रूमवर जाण्याची घाई ही दिसून येते.. करनचे बोलके डोळे जरी आता त्याने ठरवलं तरी काहीच लपवू शकत नव्हते..!!


पण, अब्बू काही केल्या इतक्यात सांगण्याच्या मूडमध्ये नव्हते.. ते रूमवर आल्यावर आधी सकाळपासून घातलेले कपडे आधी बदलतात. त्याचा सफेद पठाणी टाईप कुडता आणि त्याखाली पायजमा, दरवाज्याचा मागे असलेल्या हँगरला व्यवस्थित अडकवून ठेवतात आणि मग अंगावर असलेल्या सफेद कलरच्या बनियानमध्ये खाली कमरेवर निळ्या पांढऱ्या पॅटर्नची लुंगी चढवून थेट बेडवर जाऊन मांडी घालून बसतात.. करनला आता राहवत नव्हतं.. त्याला कधी एकदाचं किस्सा ऐकायला मिळेल असं झालं होतं.. शेवटी नं रहावुन तो बोलतो,


" क्या हुआ अब्बू..?? लगता है किस्सा सुनाने का कोई मूड नहीं हो रहा है आप का.."


थोडा टोमणा मारत अब्बूला किस्स्याबद्दल आठवण करून देतो..


" अरे ऐसा नहीं है बेटा.. किस्सा सुनाने के लिए तो में यह आकर बैठा हु.. तो तुम्हे यही फ़िलहाल जानना है ना के, मैं ने जो आप लोगों में " श्री गणेशा करो " याने हमारे में बिस्मिल्लाह करो, ये कैसे पता..?? "


अब्बूच्या सर्वकाही लक्ष्यात आहे हे बघून करन एखाद्या लहानमुलागत आनंदाने त्यांच्या पुढ्यात जाऊन बसतो आणि उत्साहात बोलतो,


" हां अब्बू.. यहीं सुनना है अभी के लिए तो.. वरना मेरी रात इसी सोच में चली जाएगी के आप को कैसे इतना पता है.."


तर अब्बू आता जास्त फुटेज नं खाता किस्स्याला सुरुवात करायला जातात आणि इथे करन कानांत प्राण आणून पूर्ण लक्ष्य अब्बूकडे एकटवून त्यांच्या पुढ्यात मांडी घालून बसलेला असतो..


काही सेकंद तशीच शांततेत जातात आणि मग अब्बू एक लांब श्वास घेऊन मूळ किस्स्याला सुरुवात करू लागतात..!!


क्रमशः

लेखक : सतीश रमेश कांबळे.

DMCA.com Protection Status

Saturday, March 22, 2025

गुलसत - भाग 3



जेमतेम तासाभरात त्यांना एक राहण्यायोग्य हॉटेल सापडतं.. टपरीवरून निघतानाच संध्याकाळ होवून गेली होती.. सूर्य जवळपास मावळण्यातंच जमा होता.. त्यामुळे हॉटेलपर्यंत पोहचता पोहचता काळाकुट्ट अंधार झाला होता.. वेळ रात्रीची होती आणि हॉटेलचं नाव होतं "प्रभात.." काय उलटा योगायोग होता हा..!! त्या अंकलंने आणि करनने पटापट आपआपलं सामान घेतलं, व ते आत बुकिंग काउंटरजवळ आले. करनने त्याच्या नावाने रूम बुक केली आणि आधार कार्डची झेरॉक्स देवून ते दोघे चावी घेवून रूमवर आले. त्यांची रूम ही पहिल्या माळ्यावर होती आणि हॉटेलही एक मजलीच होतं.. जास्तं लवाजमा नव्हता ह्या हॉटेलचा.. राहण्याची सोय मात्र उत्तम होती. तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर राहण्यासाठी रूम्स होते... खाली हॉटेलच्या पटांगणात जेवण्यासाठी जागा बनवली होती.. आत रूममध्ये टॉयलेट आणि बाथरूमसुद्धा व्यवस्थित साफ केलेले होते.. थंडीचे दिवस होते त्यासाठीसुद्धा आत बाथरूममध्ये गिझरची व्यवस्था केलेली होती.. रूमचं वातावरण बघायला गेलं तर जवळजवळ घरच्या सारखंच होतं... करनने त्याची बॅग रूममध्येच असलेल्या कपाटात ठेवून दिली.. तो अंकल मात्र रूममध्ये आल्याबरोबरच टॉयलेटला गेला होता.. करन तोपर्यंत हाथ-पाय धुवून फ्रेश होतो, आणि बॅगेतून त्याचा लॅपटॉप काढून action camera मध्ये, सकाळपासून जे-जे शूट केलेलं होतं, ते सर्व व्हिडिओज लॅपटॉपमध्ये ट्रान्स्फर करायला लागतो.. यादरम्यान तो अंकल पण फ्रेश होवून बाहेर येतो.. करनच्या लॅपटॉपकडे नजर टाकत तो बोलतो - " ये क्या कर रहे हो बेटा.?? कोई ऑफिस का काम तो नहीं कर रहे हो ना.?? इतना सफर करने बावजूद भी आपको थकान हुई नहीं क्या.??" तो एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती करनवर करतो.. " आज जो विडियोज शूट हुए है, वही सब में लॅपटॉप में डाल रहा हूं.." - करन लॅपटॉपमध्ये नजर घालूनंच त्या अंकलला बोलतो. "अच्छा ठीक है" बोलून तो बॅगेतून कुराण काढून, जमिनीवर एक नक्षीकाम केलेला चौकोनी सुंदर असा कपडा अंथरतो.. साधारण एका माणसाला बसता येईल एवढ्या लांबी रुंदीचा तो कपडा होता.. कपडा व्यवस्थित अंथरूण, त्यावर एक स्टँडगत काहीतरी ठेवून, त्यावर कुराण ठेवून, तो कुराणचं पठण करायला लागतो.. करन फक्त एक तिरपी नजर त्या अंकलकडे टाकून, पुन्हा आपल्या कामात व्यस्त होतो.. करनचं काम आता जेमतेम झाल्यातंच जमा होतं, आणि त्या अंकलचंही कुराण पठण झालं होतं.. तो कुराण वाचून झाल्यावर आपल्या डोळ्यांना लावून, ओठाने हलकेच स्पर्शकरून, पुन्हा व्यवस्थित बॅगेत ठेवून देतो.. करन त्या अंकलला कुतूहलाने बघत असतो.. मनातल्या मनात आपण भगवत गीतेचं पाठ केव्हा केलं होतं बरं..?? हे तो आठवू लागतो.. त्याचवेळेस तो अंकल करनच्या पाठीवर हलकीच थाप मारत , " करन बेटा, आपकी ये बार-बार खयालों में खोने की आदत बदलकर, हक़ीक़त में जीने की आदत डाल लो.. वरना खयालों के चक्कर में जिन्दगी जीना भूल जाओगे.." करन अंकलच्या बोलण्याने विचारांच्या दूनियेतून बाहेर येतो..आणि स्माईल देवून होकारार्थी मान हलवतो.. "अंकल, खाना यही मंगवा लूं या बाहर जाकर ही खाना पसंद करोगे आप.?? " - करन त्या अंकलला विचारतो. " बाहर जाकर ठंडी हवाओं का मजा लेकर खाना ज्यादा बेहतर होगा करन बेटा.." - तो करनला आपली इच्छा बोलून दाखवतो. " ठीक है अंकल, आप आपकी बेटी से बात कर लो, तब तक में नीचे जाकर मेरे घरवालों से फोन पर बात कर लेता हूं.." - करन त्याचे शुज घालत अंकलला बोलतो. करनच्या अश्या बोलण्याने तो अंकल मात्र थोडा चकित होवून विचारतो - "बेटा, आप कैसे जान गए के, में अब मेरी बेटी को कॉल करनेवाला हुं.?? 


करन : आप ही तो बोले थे चाय की टपरी से निकलते समय बेटी से के, में हॉटेल जाकर तुम्हे कॉल करता हूं. 


अंकल : अरे हा.. में तो ये भूल ही गया था.. ठीक है तो में अपनी बेटी से बात कर के, थोड़ी देर में आप से नीचे मिलता हुं..


करन ठीक है बोलून रूममधून बाहेर निघून जातो. करन बाहेर गेल्यावर तो अंकल त्याच्या मुलीला व्हिडिओ कॉल करतो.. पण कॉल लागत नव्हता. कदाचित ह्या रूममध्ये नेटवर्क चा प्रॉब्लेम होता.. तो बराच वेळ फोन लावण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या कॉल कनेक्ट होत नव्हता.. शेवटी वैतागून तो रूम व्यवस्थित लॉक करून करन जवळ येतो.. करन अजूनही फोनवर त्याच्या घरातल्यांशी बोलत असतो. आपला बाधा नको म्हणून तो अंकल करनला डिस्टर्ब नं करताच तिथून निघून जातो.. करनचं बोलणं होईपर्यंत तो अंकल जेवणाची ऑर्डर देवून ठेवतो. जेणेकरून करन आल्या आल्या सरळ जेवायला बसेल.. थोडक्यात काय तर वेळेची बचत... येवढा सगळा विचार करत असताना त्या अंकलच्या फोनची रिंग वाजते.. खिश्यातून मोबाईल काढून बघतो तर काय, त्यांच्या मुलीचा वीडियो कॉल आला होता imo ॲपवर.. मुलीच्या कॉलने त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाची कळी खुलते..!! येवढ्या वेळ ते त्यांच्या मुलीला कॉल करण्याचा प्रयत्नं करत होते.. पण, नेटवर्क नसल्यामुळे कॉल कनेक्ट झाला नव्हता.. त्यामुळे आता जराही वेळ वाया नं घालवता, ते पटकन कॉल रिसिव्ह करतात.. समोर त्यांची मुलगी त्यांना दिसते.. पण, तिच्या डोळ्यांत भीती आणि भीतीपोटी काळजी साफ दिसत होती.. त्यांच्या बापाच्या नजरेला हे लगेच जाणवतं.. कितीही केलं तरी तो शेवटी तिचा बाप होता.. तो चिंताचुर होवून तिला काळजीच्या सुरात विचारतो..


अंकल : क्या हुआ गुलसत बेटा.?? किस टेंशन में हो.?? क्या हुआ गुलसत कुछ तो बताओ.?? वहां सब ठीक तो है ना बेटा.?? 


एकामागोमाग एक तो प्रश्नांचा भडिमार करतो.. ती थोडा वेळ शांत होते.. काहीच नं बोलता नुसतं तिच्या वडिलांना डोळे भरून बघू लागते.. नकळत तिच्या डोळ्यात पाणी यायला लागतं.. हे सर्व बघून तिचे वडील आता खूप घाबरतात.. आपली मुलगी ठीक तर आहे ना, ह्या चिंतेने त्यांना आता पूर्णपणे घेरलं होतं.. तो त्याच हतबल आणि चिंतेने ग्रासलेल्या अवस्थेत तिला पुन्हा विचारतो...


अंकल : क्या हुआ बेटा.?? तुम रो क्यों रही हो.?? तुम्हारी चुप्पी मुझे अंदर ही अंदर खाई जा रही है.. बोलो गुलसत बेटा..कुछ तो बोलो..


तो अगतिकपणे सर्व बोलत राहतो. बोलताना त्यांचा आवाज नकळत वाढला होता, हे त्यांच्याही लक्ष्यात आलं नव्हतं.. पण त्यांच्या आवाजाने मात्र हॉटेलमधील इतर लोकांचं लक्ष्य त्यांच्याकडे जातं.. करनंही आवाज ऐकून आपला फोन कॉल पटकन आवरतं घेत, तसाच धावत त्या अंकलजवळ येतो.. घाबरलेल्या स्वरात तो अंकलला विचारतो - " क्या हुआ अंकल.?? आप इतने जोर जोर से बाते क्यूं कर रहे हो.?? परेशान भी बहुत ही लग रहे हो.?? तो अंकलला काळजीपोटी प्रश्न विचारतो आणि बोलता बोलता त्याची नजर मोबाईल स्क्रीनवर जाते आणि स्क्रीनवर त्याला गुलसत दिसते..!! संध्याकाळी जी गुलसत दिसली होती आणि आता ज्या गुलसतला तो बघत होता, त्यामध्ये जमीन आसमानचा फरक जाणवत होता.. ज्या काळ्याभोर निरागस डोळ्यांनी त्याला घायाळ केलं होतं, आता त्याच डोळ्यांत अश्रूंची लाट आली होती.. ती सतत हुंदके देत रडत होती.. करनलाही समजेना की नक्की हीची ही अवस्था कशामुळे झाली होती.. करनच्या विचारांच्या गर्देतून त्याला गुलसतचा नाजूक आवाज ऐकू येतो.. ती डोळे पुसत आपल्या हुंदक्यांना आवर घालत बोलायला लागते..


गुलसत : अब्बू.. आप ठीक तो है ना.?? में ने बहुत बुरा सपना देखा.. आपको कब से फोन लगा रही थी.. पर आपका फोन लग नहीं रहा था.. तो इसी दौरान मेरी ऑंख लग गई और मुझे बहुत डरावना सपना आया..!! जैसे ही मेरी आँख खुली तो में ने आपको कॉल लगाया.. और आपको सामने सहीसलामत देखकर, में मेरे आंसुओं को रोक नहीं पाई..


गुलसत असं बोलून पुन्हा हुंदके देवून रडायला लागते.. तिच्या रडण्यामागचं कारण थोड्याफार प्रमाणात त्या दोघांनाही समजलं होतं.. पण नक्की असं कोणतं भयानक स्वप्न बघितलं होतं तिने, की ज्याने ती स्वतःला रडण्यापासून रोखू शकली नाही.?? तिचे वडील तिला विचारणारंच होते, की तेवढ्यात त्या दोघांच्या बोलण्यात मध्येच करन उडी मारत, सरळ मुद्द्याचा प्रश्नाला हाथ घालतो.!!


करन : आपने कोनसा डरावना सपना देखा.??


करन आपल्याशी बोलेल किंव्हा आपल्याला प्रश्न विचारेल, हे तिला अपेक्षित नव्हतं.. पण, करनच्या प्रश्न विचारण्याच्यामागे त्याची आपल्याबद्दल असलेली काळजी तिला दिसत होती आणि त्यामुळे ती मनोमन ह्या अपेक्षित वळणाने मनोमनी खुशही झाली होती..!! ह्या छोटेखानी आलेल्या प्रेमाच्या वळणावर ती हेही विसरून जाते की, आपण आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल केला आहे.. ती भान हरपून गेल्यागत, सरळ करनशी बोलायला लागते..आणि तिने पाहिलेलं स्वप्नं त्याला सांगू लागते..!!


गुलसत : में ने सपने में देखा के, आप और मेरे अब्बू दोनो बाईक से जा रहे हो.. कुछ दूरी पर जाने के बाद, सामने से इक ट्रक आता है.. उस ट्रक का ब्रेक शायद फेल हुआ होता है.. तो उसी हालत में वो ट्रक बड़ी ही तेजी से आप के बाईक की तरफ आता और आप दोनो को रौंदकर आगे चला जाता है.. जैसे ही ये भयानक मंज़र में देखती हूं, तो दूसरे ही पल में डर के मारे मेरी आंखें खुल जाती है.. सपना देखने से पहले में कितनी मरतबा अब्बू को कॉल लगा रही थी.. पर अब्बू को कॉल लग ही नहीं रहा था.. उसी टेंशन में मैं सो गई और फिर ये डरावना सपना देख लिया..


तिने येवढ्या आपलेपणाने घडलेली सगळी हकीकत करनला सांगली की, काही क्षण करन तिच्यात स्वतःला पार हरवून जातो.. आणि कदाचित हेच हाल गुलसतचेही झाले होते..!!! पण ह्या दोघांच्यात मात्र ती आणि तो, तिच्या वडिलांना मात्र विसरून गेले होते...!!!!


क्रमशः 

लेखक : सतीश रमेश कांबळे.

DMCA.com Protection Status

गुलसत - भाग 2

 दोघेही प्रवासाला सुरुवात करून जेमतेम साधारण 3km झाले असतील. तेवढ्यात अबोला चिरत, " अर्रे बेटा.. इतनी दूर बाईक से सफ़र करनेवाले हो, और saftey के लिए आपने हेलमेट भी नही पहना है.. बेटा, जरा खयाल किया करो जान का.. इन्सानों की जान इतनी सस्ती नहीं होती..!! " - ती व्यक्ती करनला वडिलकीच्या नात्याने समजावत बोलते. त्या व्यक्तीच्या बोलण्याने करन अचानक गडबडीत जोरात ब्रेक मारत बाईक थांबवतो. त्या व्यक्तीला वाटतं की आपल्या बोलण्याचा करनला कदाचित राग आला असावा. तरीपण एकदा खात्री करून घेण्यासाठी तो करनला विचारतो - " क्या हुआ बेटा.?? मेरी बातों का बुरा लगा क्या.?? " " नहीं अंकल, मेरा हेलमेट उधर ढाबेपर ही रह गया है। उसपर मेरा action camera भी लगा हुआ है। अगर जल्दी रिटर्न नहीं गए तो कोई भी चोरी कर लेगा हेलमेट.. आप से बाते करते समय में हेलमेट लेना ही भूल गया था। अभी आप ही की वजह से याद आया। " - करन चिंतेच्या सुरात बोलतो. ते दोघेही साधारण 3km अंतर दूर ढाब्यापासून आले होते. करन थोड्या स्पीडमध्ये बाईक ढाब्याच्या दिशेने आणतो.. काही मिनिटांतंच ते दोघेही ढाब्यावर पोहचतात.. बाईक तशीच बाहेर लावुन तो धावतंच जिथे तो जेवायला बसला

होता त्या दिशेने जातो. समोर खुर्चीवर हेलमेट कॅमेऱ्यासोबत असलेला बघून त्याच्या जीवात जीव येतो..

तडक हेलमेट हातात घेवून कॅमेऱ्यावर एक प्रेमाने किस करतो, आणि पुन्हा बाईकजवळ येतो.. इथे तोपर्यंत ती व्यक्ती imo ॲपवर त्यांच्या मुलीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असते. रोजच्या प्रवासाबद्दल, एकमेकांच्या तब्बेतीची हालहवाल घेण्यासाठी, तसेच इथल्या लोकांबद्दल सांगण्यासाठी ही व्यक्ती रोज मुलीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असे. त्यामुळे पाकिस्तानात राहूनही त्यांच्या मुलीला घरबसल्या भारत दर्शन घडत होतं..!! 


करनला येताना पाहून ती व्यक्ती " अच्छा बेटा, बाद में बात करता हुं..वो लड़का आ गया.. तो हम यहां से अभी निकल रहे है। आगे जहां पर भी नाश्ते पानी के लिए रुकेंगे, तब तुम्हें कॉल करूंगा.. तो रखता हुं.. अल्लाह हाफिज.." - असं बोलून तो कॉल कट करतो.. " आन्टी से बात कर रहे थे क्या अंकल.?? " - करन हेलमेट घालतंच डोळा मारत त्या व्यक्तीला बोलतो. " अरे बेटा..इस बूढ़ा पे में थोड़ी ना ये सब हरकते की जाती है.. में तो अपनी बेटी "गुलसत" से व्हिडिओ कॉलिंग पर बात कर रहा था.." - ती व्यक्ती कारनचा झालेला गैरसमज दूर करत बोलते. " माफ करना अंकल, में ऐसे ही थोड़ी मज़ाक मस्ती करते रहता हुं..तो मेरी बाते दिल पर मत लगाना.." - करन आपल्या मस्तीखोर स्वभावाबद्दल थोडी माहिती देत बोलतो. " ऐसी कोई बात नहीं है बेटा.. में समझ गया था आप मज़ाक कर रहे हो.. और सफर में थोड़ा बहुत तो मजाकिया मौहोल रहना ही चाहिए.. ऐसे ही तो सफर यादगार बन जाते है। " - ती व्यक्ती करनला आपल्यालाही मस्करी स्वभाव आवडतो हे सांगण्याचा प्रयत्न करत बोलतो..


दोघांचं बोलणं रंगात आलं होतं.. बाईकनेही आता थोडी स्पीड पकडली होती..पण, आपल्यासोबत एक वडीलधारी व्यक्ती बसली आहे, ह्याचं भान ठेवत करन बाईक जास्त स्पीडमध्ये चालवत नाही.. साधारण 40km अंतर पार करून झालं असेल तेवढ्यात त्यांना वाटेवर रस्त्याच्या अगदी कडेला एक छोटीशी चायची टपरी दिसते. टपरीच्याच शेजारी नाश्ता करण्यासाठी बसायला तीन-चार लाकडी बाकडेही ठेवले होते.. करन बाईक टपरीजवळ थांबवतो. ते दोघेही बाईकवरून उतरतात.. करन आधी हेलमेट काढून व्यवस्थित त्या बाकड्यावर आणून ठेवतो आणि मग बाहेर येवून जवळच पाण्याचा छोटासा ड्रम ठेवलेला होता, त्यात हाथ घालून अर्धवट जलसमाधी घेतलेल्या मगाला बाहेर काढून तोंडावर सपासप पाण्याचे चपकारे मारतो.. ती व्यक्तीसुद्धा करनचं झाल्यावर पाणी तोंडावर मारून थोडी आलेली मरगळ दूर करते.. " क्या अंकल.., यहां तक का सफर कैसा लगा.?? मजा आ रहा है के नहीं.?? " - करन त्या अंकलला आलेली मरगळ दूर सारण्याच्या उद्देशाने विचारतो. " हा.. हा..बहुत मजा आ रहा है..!! सफर की शुरुवात तो बहुत अच्छे से हुई है बेटा.." - ती व्यक्ती आवाजात उत्साह आणत बोलते. करन त्यादरम्यान नाश्ता आणि गरमागरम चहाची ऑर्डर देतो.. ते दोघेही मग बाकड्यावर येवून ह्या छोटेखानी टपरीच्या प्रसन्न वातावरणाचा आनंद घेतात..!! 


आनंदात भंग पाडत टपरीवरची काकू गरमागरम वाफाळता चहा आणि सोबत दोन मेदू वडाच्या प्लेट्स त्या दोघांच्या पुढ्यात आणून ठेवते. "अंकल, ये चीज कभी खाई है क्या आपने.?? - करन त्या अंकलला आपल्या भारतीय पदार्थांबद्दल किती ठावूक आहे हे जाणून घेण्याच्या ओढीने विचारतो. " इसे मेदू वडा कहते है ना.? कभी खाया तो नहीं है, पर हा.. यूट्यूब पर विडियोज बहुत देखे है में ने इस चीज के। और हिंदुस्तान आने से पहले में और मेरी दोनो बेटियों ने, आप के देश की बहुत सारी विडियोज देखी है जानकारी के लिए। ताकि यहां आने के बाद ज्यादा परेशानी ना हो समझने में।" - तो अंकल एका लयीत सर्व बोलून जातो. करनला मात्र आनंदाचा एक सुखद धक्काच भेटतो त्यांच्या उत्तराने. ह्या माणसाने खूपच जय्यत तय्यारी केली आहे भारतात येण्याआधी, हे त्याला आता चांगलंच कळून आलं होतं. "आपको इतना सब पता होगा ये नहीं मालूम था मुझे। पर जब से आप मिले हो तब से में आप की एक चीज नोटिस कर रहा हुं के, आपको कुछ ज्यादा ही लगाव या मोहब्बत है हमारे हिंदुस्तान से। और ये मोहब्बत आपकी बातों से और आपकी चमकीले आंखों में से, साफ साफ दिखाई दे रही है.." - करन मेदु वड्याचा एक तुकडा तोडत बोलतो. करनच्या अश्या अनपेक्षित बोलण्याने तो अंकल मदू वड्याचा अर्धा राहिलेला घास तसाच गिळत, पटकन पाण्याचा एक घोट घेतो. करनकडे अचंबित झालेल्या नजरेने बघत तो बोलतो, - " बहुत बारीक नज़र रखते हो आप बेटा इन्सानों पर.. मानना पड़ेगा.. आप ने जो बात कही है वो सच है। आप के हिंदुस्तान से जो भी मेरा लगाव है, वो आज से नहीं है, बल्कि आज से करीब 35 साल पहले से ही है..!! और वो भी ऐसा वैसा लगाव नहीं, दिल से दिल का लगाव रहा है बेटा.." - तो अंकल डोळा मारत बोलतो. करनला त्यांचं बोलणं नीटसं कळत नाही. तो थोडा गोंधळलेला भाव चेहऱ्यावर आणत त्या अंकलकडे एकटक बघतो. करनला गोंधळलेला पाहून तो अंकल बोलतो - " बेटा, पहले नाश्ता कर लेते है, फिर आप के दिमाग में जो कोहराम मचा है वो सब सफर में आहिस्ता आहिस्ता दूर करते जाऊंगा। में थोड़ा मेरी बेटी को वीडियो कॉल कर लेता हु तब तक। उसे बोलता था में ने के, आगे नाश्ते के लिए रुकेंगे तो तुम से बात करूंगा। वो इंतज़ार कर रही होगी। "जी जरूर.. करलो बेटी से बात। तब तक में बिल भर के आता हुं.. " - करन बाकड्यावरून उठत अंकलला बोलतो. तो अंकल होकारार्थी मान हलवत त्याच्या मुलीला imo वर व्हिडिओ कॉल लावतो. त्यांची मुलगी कॉल उचलते. 

तो : " अस्सलामवालेकुम गुलसत बेटा, सब खैरत ना.?? " 

गुलसत : " वालेकुमअस्सलाम अब्बु.. यहां सब खैरत में है। आप अपनी सुनाओ.. कैसे चल रहा है हिंदुस्तान का सफरनामा.. 

(ती मिश्कीलपणे हसत बोलते..)


तो : यहां का सफर तो बड़े अच्छे से चल रहा है। मेरे साथ जो लड़का है करन उसके बिना तो मुमकिन नहीं था इतना आसानी से ये सफरनामा होना। पर अल्लाह का शूकर है, के ये बंदा फरिश्ता बनकर मेरे सफर को पूरा करने को आया है। 

(तो वर बघत वरच्याचे आभार मानत भावूक स्वरात बोलतो..)

ह्याचं बोलणं चालूच असतं तेवढ्यात करन बिल भरून त्या अंकलकडे येत बोलतो - " चलो अंकल.. निकलते है अब। रात होने से पहले हमे एक अच्छीसी होटल देखकर रूम भी लेना है। करन त्या अंकलच्या मोबाईल स्क्रीनवर व्हिडिओ कॉल दरम्यान फ्रेममध्ये येतो आणि त्याचवेळी गुलसत पहिल्यांदा करनला बघते..!! करनची ही नजर सहजच मोबाईलवर पडते आणि दोघांची ही नजर एकमेकांना भिडते. काही क्षण दोघेही एकमेकांच्या नजरेत, एकमेकांना कैद करून घेतात..!! गुलसत दिसायला नाकी-डोळी छान होती.. काळेभोर डोळे.., चेहऱ्यावर लहानमुलांगत निरागसपणा.. गोल नाजुकसा चेहरा .. तसा कारनही दिसायला बराच होता. थोडीशी शिवाजी महाराजांगत दाढीची ठेवण त्याच्या जरा लांबट निमुळत्या चेहऱ्यावर शोभून दिसत होती.. मध्यम आकाराचे निरागस डोळे.. आणि चेहऱ्यावर सतत असणारं हास्य ह्यामुळे करन चार चौघात सहज उठून दिसत असे.. दोघांच्या नजरेची कैद काही क्षण अशीच चालू असताना, जेलरने शिट्टी मारावी तसं तो अंकल मध्येच बोलतो - " चलो बेटा, अब रखता हुं.. अब होटल में पहुंचने के ही बाद तुम्हें कॉल करता हुं। तब तक तुम खाना खा लेना। अल्लाह हाफिज। 

त्या अंकलच्या अश्या बोलण्याने ते दोघंही भानावर येतात, आणि करन मग आपली नजर चोरत, हेल्मेट बाकड्यावरून उचलत, बाहेर बाईकजवळ येवून उभा राहतो.


गुलसत : अच्छा ठीक है अब्बू.. दवाई टाईम पर खा लेना और संभलकर जाना। अल्लाह हाफिज..


असं बोलून ती कॉल कट करते.. आणि मग तो अंकल बाहेर जिथे करन आधीच येवून त्याची वाट बघत उभा असतो, तिथे येतो.. 


मग ते दोघेही आजचा थकवा घालवण्यासाठी, त्यांचा मोर्चा थेट हॉटेलच्या दिशेने वळवतात..!!


क्रमशः 

लेखक : सतीश रमेश कांबळे.

DMCA.com Protection Status

गुलसत - भाग 1



दुपारची वेळ होती.. थंडीचा महिना असल्यामुळे भर उन्हातही अंग थंडीनं शहारत होतं.. करन तिथेच रस्त्याकडेच्या धाब्यावर जेवायला बसला होता..गालातल्या गालात हसत..कसल्याश्या तरी विचारात स्वतःला हरवत, स्वतःच्याच तंद्रीत तो जेवणाचा आस्वाद घेत होता.. त्याचं हे थोडं असं वेगळं वागणं त्याच्याच पुढे काही अंतरावर बसलेला एक पन्नाशीतील वयस्क व्यक्ती कुतूहलाने पहात होता.. बराच वेळ करनचं असं वागणं, गालातल्या गालात हसणं ह्याने ती वयस्क व्यक्ती नं रहावून शेवटी करनजवळ जावून काही विचारायच्या मुद्रेने उभी रहाते..!! आपल्या पुढ्यात अचानक कोणीतरी येवून उभं राहिलं आहे हे जाणवल्याने, करन त्याच्या तंद्रीतून बाहेर येतो आणि त्या व्यक्तीच्या दिशेने पाहून बोलतो, " तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे का.?? " - करन बोलला, पण त्या माणसाला काहीच कळालं नाही की नक्की करन काय बोलला ते.. कारण कळायला मुळात तो माणूस भारतीय नव्हताच..!! तो तर आला होता आपल्या शेजारील देशातून..पाकिस्तानातून..!! त्यामुळे करनचं मराठीतलं बोलणं त्याच्या डोक्यावरून गेलं होतं..

" जनाब..माफी चाहता हुॅं, पर आप अभी क्या बोले मुझे समझ नहीं आया। पर बहुत वक्त से में आपको देख रहा हुॅं..आप अपने आप में ही खुश हुए जा रहे हो..खुद के खयालों में ही खोए हुए हो। तो मुझे रहा नही गया और में आप से पूछने चला आया " - तो माणूस बोलता झाला..

करनला त्या माणसाची आपल्याबद्दल जाणून घेण्याची ओढ जाणवली, आणि त्याने त्या माणसाला अगदी सहजपणे उत्तर दिलं, " में मेरी खुशी की वजह किसी और में नहीं ढूंढता और ना ही खुशी को ज्यादा इंतज़ार कराता हुॅं। में बहुत महीने पहले से ही "बाईक राइड" पर जाने के बारे में सोच रहा था। काम की वजह से जा नहीं पा रहा था। पर अब मौका मिला है तो निकल पड़ा हुॅं मेरी जिन्दगी जीने..!! और यही सोचकर में मन ही मन खुश हो रहा था के, ना जाने आगे अनजाने रास्तों पर कितने हसीन पल और मोड़ आनेवाले है मेरी जिन्दगी में। और वैसे भी, अनजाने रास्तों पर चलने का मज़ा पहचाने रास्ते कहा दे पाते है।। " वाक्याच्या शेवटी डोळा मारत करनणे एक फिल्मी डायलॉग चीपकुन दिला..!!



तो माणूस करनचं बोलणं ऐकून भलताच खुश होतो.. त्याला बघायला गेलं तर कारणही तसंच होतं.. हा माणूस पाकिस्तानहून आपल्या भारतात एक महिन्याच्या visitor visa वर, भारत भ्रमंती करायला आला होता.. त्याला आपला देश बघायचा होता खरा, पण टीपिकल टूर गाईड्सच्या ठरलेल्या रोड मॅपने नाही, तर स्वतःच फिरत फिरत जिथे मन करेल तिथे जायचं होतं त्याला..!! आणि त्यासाठी तो, जो रस्त्यात गाडीवाला किंव्हा बाईकवाला भेटेल त्याला लिफ्ट मागत होता, आणि असं करत करत तो कसा बसा गेला एक आठवडाभर फिरत होता..!! ज्या शहरात त्याला लिफ्ट देणारी व्यक्ती सोडत असे, त्याच शहारत तो त्या दिवसापूरता राहून पूर्ण शहर फिरून घेत होता.. बस, टॅक्सी, रिक्षा..जे मिळेल ते पकडुन, जेवढं बघता येईल, फिरता येईल, ज्या फेमस डिशेस आहेत ते खाता येईल तेवढं खात होता, आणि मग रात्री एखादं हॉटेल बुक करून पूर्ण रात्र तिथेच काढत होता.. हा त्याचा दिनक्रम एक आठवडा सलग चालला होता. पण आता यापुढे असं करून चालणार नाही, हे त्याला जाणवलं होतं.. ह्याला त्याला लिफ्ट मागून केलेल्या प्रवासात खूप वेळ वाया जात होता. लिफ्ट मागताचक्षणी त्याला कोणी लिफ्ट देत होतं असं नव्हतं.. कधी अर्धा तास तर कधी तासनतास वाट बघावी लागत होती.. आणि त्यातच परका देश, परकी माणसं ह्यामुळे साहजिकच कोणालाही थोडं असुरक्षित वाटणं आलंच.. त्याबरोबरंच नक्की कुठे जायचं.?? काय बघायचं.?? हे जमवताना त्याला तारेवरची कसरत करावी लागत होती.. ह्यामुळे करन जेव्हा बाईक राईडबद्दल बोलला, तेव्हा त्याला साक्षात देवंच भेटल्यागत झालं होतं..!! 


त्याने मनोमन ठरवून टाकलं होतं की, आता यापुढचा जो पण प्रवास असेल, तो आपण करनसोबतंच करायचा..!!

" क्या हुआ अंकल.?? किस सोच में खो गए आप.?? " करनने अचानक विचारलेल्या प्रश्नाने तो माणुस भानावर आला.. " नहीं नहीं बेटा..में यूंही सोच रहा था के, अगर आपको कोई दिक्कत ना हो तो, क्या में भी आप के साथ बाईक राइड पर चल सकता हूं क्या.?? तो अगदी ओशाळलेल्या नजरेने करनला विचारतो.. करन ते समझतो, आणि आपल्यासोबत राईडला घेवून जाण्यासाठी मान हलकीच वर खाली करून होकार दर्शवतो.. करनच्या होकाराने तो माणूस खूप खुश होतो..


दोघेही जेवण आटोपतात आणि करनच्या बाईकजवळ येतात. करनची बाईक ही सफेद कलरची Avenger 220 cruise bs6 मॉडेलची होती.. त्यात त्याने थोडं modification ही करून घेतलं होतं..!! मागे सामान ठेवायला बॉक्स बसवून घेतला होता.. रात्रीचं व्यवस्थित दिसावं ह्यासाठी त्याने फॉग लाईट्स लावून घेतल्या होत्या.. लाँग राईडसाठी जी तय्यारी करायला हवी होती, ती त्याने चोख केली होती..!! बराच वेळ ती वयस्क व्यक्ती करनच्या बाईकला कुतूहलाने न्याहाळत होती.. एव्हाना करनच्या हे लक्ष्यात आलं होतं.. " क्या हुआ अंकल.?? ऐसी बाईक पहले कभी देखी नहीं क्या.?? - करन मस्करीमध्ये त्या व्यक्तीला बोलतो.. " देखी है, पर बहुत कम.. पर आप के हिंदुस्तान में तो हर तरफ ही, बहुत ही लाज़वाब बाईक्स आते जाते नजरों पर पड़ती रहती है.. हमारे यहाँ तो अभी तक 30 साल पुराने बाबा आदम की बाईक्स के मॉडल चल रहे हैं रास्तों पर..!!" - ती व्यक्ती थोडी हताश होवून बोलते. " हमारे यहाँ.?? में कुछ समझा नहीं अंकल.." - करन गोंधळलेल्या स्वरात त्या व्यक्तीला विचारतो. " हा, हमारे यहाँ.. में दरअसल पाकिस्तानी हुं..!! आप के हिंदुस्तान घूमने आया हुं इक महीने के लिए..!!" त्याने आपण कुठून आणि कशासाठी आलोय हे सांगितल्यावर त्याला वाटलं की, करन हमखास आता आपल्याला त्याच्यासोबत येण्यास मनाई करेल. त्यामुळे थोडं आता ती व्यक्ती ह्या विचाराने चिंतेत आली होती.. आपण चूक तर केली नाही ना आपण पाकिस्तानी आहोत हे सांगून.?? ती व्यक्ती बराच वेळ चिंतेत नको ते विचार करायला लागली.. करन त्याला असं थोडं चिंतेत पडलेलं बघून हसायला लागतो.. " अर्रे अंकल..टेंशन मत लो.. आप पाकिस्तानी हुए तो क्या हुआ, हो तो अभी हमारे हिंदुस्तान के मेहमान ही ना..!! और ' अतिथि देवो भवाः ' ही हमारे देश की परंपरा है.. तो ज्यादा उलटा सोचो मत.. और आगे आपकी जितनी भी उलटी सोच है, वो सब बदलनेवाली है..!! - करन चेहऱ्यावर स्माईल आणत बाईकवर बसतो, व त्या व्यक्तिलाही बसायला सांगतो..


आणि मग त्या दोघांच्या एका अविस्मरणीय प्रवासाला सुरुवात 

होते..!!! 


क्रमशः

लेखक : सतीश रमेश कांबळे.

DMCA.com Protection Status

Saturday, November 4, 2017

ओढ... ( कविता )

भेटायची ओढ होती
तरी भेटण्याची वेळ नव्हती
बोलावसं वाटलं तरी
बोलण्याची वेळ नव्हती
सांगावसं वाटत होतं
तरी सांगण्याची वेळ नव्हती
ती वेळंच जणू अशी
माझ्यावर रूसली होती...

ती समोर होती, मी समोर होतो
नजरेला नजरसुद्धा भिडत होती
हलकेच नजर चोरून मी
मग नजर तिची चुकवत होतो
बदललो नव्हतो मी नक्कीच
तरी बदलल्यागत वागत होतो
जाणून-बूजून मी तेव्हा
माझ्या मनाशीच खेळत होतो...

संपलं नव्हतं नातं तरी
का संपल्यागत ते भासत होतं..??
अस्तित्त्व तिचं असूनसुद्धा
नाकारावसं वाटत होतं
नजरेसमोर होतं सगळं
तरी नजरेआड सारं गेलं होतं
शोधून-शोधून थकण्यापेक्षा
आता विसरण्यातंच सारं भलं होतं...


कवी : सतीश रमेश कांबळे.

DMCA.com Protection Status

Tuesday, October 3, 2017

रात्री-अपरात्री..





माझा पूर्ण परिवार दोन दिवसांपूर्वीच गावी जत्रेसाठी गेला होता. त्यामुळे मला सोबत म्हणून विशाल माझ्या घरी गेल्या दोन दिवसांपासून झोपायला येत होता. आजही तो आला होता. घरी कोणी ओरडायला नसल्यामुळे, रात्रीचं जेवण आवरल्यावर मी आणि विशाल हायवेजवळ असलेल्या टपरीवर सिगरेटसोबतंच गरमागरम वाफाळलेल्या चहाचा घोट घेण्यासाठी माझ्या बाईकवरून निघालो. आमच्या घरापासून हायवे साधारण सहा किलोमीटर लांब. खरंतर चहा वगैरे बहाणाच.. हा थंडीचा मोसम.. त्यामुळे बाईकवरून असं  रात्रीचं सुसाट जाण्याची मज्जाच काही वेगळी असते.. बाईकच्या वाढणा-या स्पीडसोबतंच सुईरारखी बोचणारी थंडी अंगावर मस्तीचे शहारे आणण्यासाठी पुरेसे असतात..!! त्यात विशालसारखा अतरंगी मित्र सोबत, मग काय धम्मालंच की...!!!

बाईक डांब-या रस्त्यांवरून सुसाट चालली होती.. रात्र असल्यामुळे रस्त्यांवर दिवसा असते तशी गाड्यांची वर्दळ नव्हती.. त्यामुळे बेशूट गाडी पळवण्याचा मला परवानाच मिळाला होता.. पण, ते कोण्या शहाण्याने म्हंटलंच आहे ना की, "जोश में होंश मत खो ना.."  अहो आमचंही तसंच काहीतरी झालं तेव्हा. म्हणजे, सुसाट गाडी पळवण्याच्या जोशमध्ये आम्ही चहाच्या टपरीपासून एक दिड किलोमीटर थोडं जास्तंच पुढे आलो. मग गाडी तशीच कडेकडेनी "राँग वे" ने टाकत टपरीजवळ आणली. बाईक तिथेच आडोश्याला लावली आणि तडक हात सिगरेटच्या पॅकेटावर टाकले.. विशालच्या हाताचा पंजा आदीमानवासारखा फताडा असल्यामुळे ती खजिन्याची पेटी पहिली त्याच्याच हाताला लागली. शहाण्याने स्वतःसाठी एक सिगरेट काढली आणि पॅकेट माझ्याकडे वळवलं. मी ही एक सिगरेट काढून पॅकेट सरळ आत टपरीत भिरकावून दिलं.. टपरी पत्र्याच्या भिंतीने झाकली असल्यामुळे ते नाजूकसं पॅकेटसुद्धा पत्र्यावर आपटाचक्षणी विजेच्या कडकडांसारखा जोरदार आवाज झाला. मग त्यावर टपरीतल्या काका काकूंनी कवट्यामहाकाल सारखा खतरनाक लूक मला दिला. मीसुद्धा बघून नं बघितल्यागत केलं आणि गप्पं विशालजवळ जावून उभा राहिलो. तोपर्यंत काकूंनी चहाचा टोप गॅसवर चढवला.. थोड्याच वेळात चहाचा कडक सुगंध आमच्या नाकपुड्यांत घुसायला लागला.. सिगरेटसुद्धा संपल्यातंच जमा होती. म्हणून, शेवटचा श्वास घेत असलेल्या सिगरेटची धडपड मी एका दममध्येच थांबवून टाकली आणि मग तिचं उरलेलं अवशेष पायाखाली चिरडत पायानीच मातीत गाडून टाकलं..!! थंडी असल्यामुळे साहजिकंच लघवीलासुद्धा अधूनमधून जावं लागत होतं. काकू कळकटलेल्या पेल्यामध्ये वाफाळलेला चहा ओतायच्या आधीच मी तिथून थोडं पुढे रस्त्याच्या कडेला, वृक्षदिनाच्या निमित्ताने लावलेल्या रोपांचा आडोसा घेत हलका होवू लागलो. आजूबाजूला नजर टाकली तर नुसता काळोखंच काळोख.. आता विशालचा काळा चेहरा बघण्याची सवय झाली असल्यामुळे ह्या काळोखाची फारशी भिती वाटली नाही म्हणा. पण तरीही मी घाबरलो नाही हे माझं मलाच पटण्यासाठी गाणी गुनगुनू लागलो. आता माझ्या गाण्याचा प्रभाव म्हणा किंवा माझ्या सुरेल आवाजाचा प्रभाव म्हणा हवं तर..पण, ते ऐकून अचानक चक्क एक म्हातारी बाई माझ्यासमोर हाकेच्या अंतरावर प्रगट झाली. तिला बघून पटापट आवरतं घेत पटकन पँटची झीप लावली आणि गांगरलेली नजर तिच्याकडे टाकत एक जबरदस्तीची स्माईलंही दिली.. अबबबं..पहातोय तर काय, तर ती म्हातारीही शेवटचा उरलेला दात दाखवत ओठ पसरून चक्कं हसली.. च्याआयला, ऐवढा खर्च करून पण एक मुलगी पटत नाही ईथे आणि आता नं पटवताच ही म्हातारी फुकटची लाईन देतेय राव.. ह्यावर हसू की रडू हे समजत नव्हतं आणि तिला विचारण्याचं धाडस काय माझ्यात तरी नव्हतं बुवा.. त्यात तिथून विशाल "महिन्याभराचा कोटा आजंच पूर्ण करतोयस का.?? साल्या, चहा थंडं होतोय लवकर ये" हे घसा ताणून बोंबलत होता. आता त्याला काय सांगू ह्या म्हातारीला बघून मी कसा थंडं पडलोय ते..!! मला तर वाटतंय ही म्हातारी वेडी असणार.. बघा ना केव्हापासून नुसती वेड्यागत हसतेय. बापरे, कदाचित माझ्या मनातलं तिनं ऐकलं.. कारण, हसणं थांबवून ती आता माझ्या दिशेने एक हात मोडकळीस पडलेल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवून दुसरा पाय बहुतेक वाटी नसल्यामुळे फरफटत आणत होती. तिला बघून खरंतर मला जोरात किंकाळी फोडायची होती.. पण, का कोणास ठाऊक अशावेळी घशातून आवाज का निघत नाही..?? की, आवाजाचीही टरकते अश्यावेळी बाहेर पडायला..!!  जे काय असेना ती म्हातारी आता बघता-बघता माझ्या पुढ्यातंच येवून उभी राहिली. माझ्या भेदरलेल्या डोळ्यांत डोळे घालून ती तिचा एक उरलेला दात दाखवत कसल्याश्यातरी नजरेने बघायला लागली. थोड्या वेळासाठी मला वाटलं, आता ही जादूची झप्पी देतेय की काय..!! पण, नशीब..तिने तसं काही केलं नाही.. कदाचित "मुन्नाभाई एम.बी.बी.एस." बघितला नसेल तिने..!! 

अंगावर लालभडक नववारी साडी, हातात हिरव्या पिवळ्या बांगड्या, थकलेला पण तश्यातंही उठून दिसणारा चाबरट चेहरा, पाठीत वाकलेला कणा, डाव्या हाताने छातीशी धरून ठेवलेलं एक छोटसं गाठोडं आणि एका बाजूने चिमटलेलं डोकं.. ह्यापलीकडे आजीबाईंचं वर्णन करण्यासारखं काही नव्हतंच. हाताची बोटं तर चाकूसारखी दिसत होती. त्यामुळेच बहुतेक तिच्या हाताला चित्रविचित्रं जखमा झाल्या होत्या..!! ती तिची चाकूसारखी दिसणारी बोटं हळूहळू माझ्या चेह-यावरून फिरवू लागली..ओठांतल्या ओठांत काहीतरी पुटपुटायला लागली. आईशप्पथ सांगतो, मला तर तात्या विंचूच डोळ्यांपुढे दिसू लागला.. ओम फट स्वाहा..हा.! पण दुदैवं बघा.. ईथे लक्ष्याला वाचवायला ईनस्पेक्टर महेश जाधव जवळ नव्हता.. तो तर लक्ष्याच्या म्हणजे माझ्या वाटणीच्या चहाचा घोट मारण्यात दंग होता.. व्वा रे तेरी दोस्ती..!!

ती आजीबाई तर आता फुल फाॅर्ममध्येच आली होती की. तिने तोंडाचा जबडा अजगरासारखा उघडला.. आतून सापागत टोकाला विभागलेली जीभ भसकन बाहेर काढली. हो पण, भसकन काढण्याच्या नादात तिचा शेवटचा दातंही उखडून जमिनीवर टपकन पडला..!! आता काय.. हि बया तर आणखीनंच भयानक दिसायला लागली.. जीभ तर काय, ईथून तिथून नुसती थयथय नाचत होती.. डोळे तर वाटत होते की, आता कोणत्याही क्षणाला माझ्या थरथरत्या हाताच्या ओंजळीत येवून पडतील. काही वेळापूर्वी ओढलेल्या सिगरेटचा धूर आता ध्यानीमनी नसताना नको तिथून बाहेर पडत होता.. नुसता धूरंच धूररर.. धुराच्या वासाने म्हातारी आणखीनंच चेताळली. उभ्या जागेवरंच गरागरा फिरू लागली. डोळ्यांच्या बाहुल्या बेताल नाचवू लागली. मग, डोक्याला झटका देत केसांचा विरळ झालेला बुचडा झपकन चेह-यावर  सोडला. त्या केसांच्याआड दिसणारा तिचा चाबरट चेहरा बघून मला भुलभुलय्यामधली मोंजोलीका आठवली नसती तर नवलंच..!! तेव्हा मग अक्षय कुमारला स्मरून होती नव्हती तेवढी सर्व हिंम्मत एकटवून तिला घाबरतंच विचारलं,
- "ओ आजी, बस करा की. पोराचा जीव घेताय का आता.? किती नखरे कराल ह्या वयात. घाबरलं की पोरगं..!!"

पण, आजी काय हू नाय की चू नाय. थोड्या वेळासाठी वाटलं की ही वेडीच नाही तर बहिरी आणि मुकी पण आहे. म्हणून म्हंटलं बघू साईड लँग्वेजमध्ये बोलून काय होतय काय. पण कसलं काय.. म्हातारी तर भलतीच शहाणी निघाली की राव. साणकन कानशीलात लावली माझ्या..
- ये भाड्या, तुला काय तसली बया वाटली व्हय रं.. नसत्या
खाणाखुना कशाला करतंय..??

देऽऽऽवा.. हेच बाकी राहिलं होतं आयुष्यात बघायचं तेवढं.  रात्री अपरात्री एका म्हातारीच्या हातून असा मार खावा लागण्यासारखं मोठं दु:खं काय असावं बरं. तरी बरं, कोणी बघितलं नव्हतं हानताना. नाहीतर लाज गेली असती चार चौघांत.. म्हातारीने सनकवलेला गाल तसाच चोळत विशालच्या वाटेवर नजर लावून बघत असताना म्हातारी पटकन पचकली,
- म्या तुझ्याकडं मदत मागाया आलीया.. माझं घर ईथून लय लांब त्या तिथं वडेगावास्नी.. मला माझ्या घरी जायचंया..पर पदराशी एक दमडी पण नाय रं पोरा.. मला पैकं दे, लय ऊपकार व्हतील पोरा..

म्हातारी फारंच अगतीक होवून बोलली राव. मला काय रहावलं नाही. तसा लहानपणापासूनंच मी खुप हळवा. त्यामुळे हिला मदत करावी असं मनापासून वाटलं. खिश्यात चार-पाचशे रूपये होते ते सर्व तिला देण्यासाठी हात खिशात टाकला. म्हातारीला पैसे द्यायला मी हात पुढे केला खरा पण, तेवढ्यात विशालची हाक ऐकू आली. त्यासरशी मी दचकून हात तसाच आवरता घेतला. विशाल पाच-सहा पावलं दूर अंतरावरून बोंबलला,
- अरे ये येड्या.. एकटा काय बडबडतोयस.? आणि पैशे कोणाला देतोयस.?? सिगरेट चढली की काय तुला.?

विशाल असा काय बोलतोय हे मला समजत नव्हतं. साक्षात माझ्या पुढ्यात उभी असलेली म्हातारी ह्याला दिसली नाही काय..?? येडा कुठचा.. ऐवढे भदाडे टपोरे डोळे देवाने देवूनंही साला ह्याची बत्ती गुलंच. अरेरेरेरे.. काय दुदैवं म्हणावं ह्याला. बघा आजीबाई कसा येडछाप मित्रं आहे माझा. बघा जरा..बघा. असं बोलून मी म्हातारीच्या दिशेने वळलो. पण, कसलं काय.. बघायला म्हातारी तिथे होतीच कुठे.! ती तर केव्हाच मिस्टर इंडियावाणी गायब झाली होती माझ्या पैश्यांसकट. मग, रिकामा हात डोळ्यासमोर धरत मी पार रडकुंडीला येवून बोललो,
- विशाल भावाऽऽ, त्या म्हातारीने तर मला पार लुटला यार.. बघ, कसं ठणठण गोपाळ करून टाकलं मला.
- अबे, कोणत्या म्हातारीबद्दल बोलतोयस.? विशाल चेह-यावर आट्या पाडत बोलला.
- अरे तीच म्हातारी जिच्याशी मी आता बोलत होतो.
- ये बाबा, येडाबिडा झालास काय. केव्हापासून तुला एकट्यानेच बडबडताना बघतोय. कसली म्हातारी नी कसलं काय.! चल निघूया आता.
विशाल डोक्याला टपली मारत बडबडला. थोड्या वेळासाठी मी सुन्नं. सुचतंच नव्हतं काय. ती म्हातारी भूत बित तर नव्हती ना.? डोक्यात खुप सारे प्रश्न आणि मनात टरकवणारी भिती. खुपंच डेडली काँबिनेशन.! तेव्हा खांद्यावर विशालची थाप पडली. मागे रस्त्याच्या दिशेने बोट दाखवत,
- सत्या, तुला दिसलेली म्हातारी, तीच का.? 
मी पटकन मान रस्त्यावर वळवली. तर बघतोय काय, तर हि तीच म्हातारी..!! च्याआयला, पण ही ईथे आलीच कशी..?? आणि रस्त्याच्या मधोमध उभी राहून नक्की करतेय तरी काय..?? मी मनातल्या मनात माझ्यापरीने अंदाज बांधायला लागलो. पण, तेवढ्यात विशाल जोरात बोंबलला. ओऽऽ आजीऽऽ.. व्हा की साईडला. जीव जास्तं झालाय काय तुम्हाला..?? जायचा ना एखादा गाडीवाला वर घेवून.. काय आश्चर्य बघा.. विशालची काळी जबानची जादू चालली आणि त्याचं बोंबलनं संपायच्या आतंच आमच्या डोळ्यांदेखत एक भरधाव ट्रक म्हातारीला चिरडत निघून गेला.! जाता जाता त्या ट्रकने काका-काकूंच्या टपरीलासुद्धा जोरदार धडक दिली. त्या धडकेचा आवाज मला धडकी भरण्यासाठी पुरेसा होता. मग स्वतःला कसंबसं सावरत विशाल आधी म्हातारीजवळ धावला..आणि मी भितीने घश्यात अडकलेला आवाज बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तसाच उभा राहिलो. विशाल म्हातारीजवळ पोहोचला खरा. पण, म्हातारीने परत एकदा चकमा दिला ना राव. ना तिथे म्हातारी होती ना तिच्या रक्ताच्या खुणा..!! आता टरकायची वेळ विशालची होती. ऐवढा जनावरासारखा दिसणा-या माझ्या सालस मित्राची बोबडीच वळली की भितीने. मग तसाच किंचाळत तो धावत माझ्याजवळ आला. त्याच्या किंचाळण्याच्या आवाजाने केव्हाचा घश्यात अडकलेला माझा आवाजही बाहेर पडला. मग आमचा मोर्चा तडक काका-काकूंकडे वळला. वायुवेगाने आम्ही अपघातग्रस्त टपरीजवळ धावलो. पण.... आता तर हद्दच झाली होती. ईथे ट्रकने फूटबाॅलसारखी उडवलेली टपरीसुद्धा जागेवर नव्हती. काका-काकूही दिसत नव्हते कुठेच. हे नक्की काय चाललंय काहीच कळत नव्हतं. त्या ट्रकने टपरीचा चुराडा करताना आम्ही दोघांनीही नीट पाहिलं होतं. मग टपरी गुडुप कशी काय झाली..?? देऽऽऽवा..तुच वाचव आम्हाला आता. ही भूताटकीच आहे विशाल. चल पटकन कलटी मारू ईथून. मी वाढलेल्या हृदयाच्या ठोक्याला आवर घालत बोललो. तसे आम्ही दोघेही बाईकच्या दिशेने पळालो. धापा टाकतंच आम्ही बाईकजवळ पोहोचलो. चावी काढण्यासाठी खिशात हात खुपसला. पण, चावी खिशात नव्हतीच. कदाचित पळण्याच्या गडबडीमध्ये चावी टपरीजवळंच कुठेतरी पडली असणार. त्यामुळे मी ती घेण्यासाठी परत माघारी फिरलो. विशालंही माझ्यासोबत आला. हो पण मला मदत करायला नाही तर टरकल्यामुळे त्याला एकट्याला उभं रहावत नव्हतं म्हणून.! तसं तो सोबत आला ते बरंच होतं म्हणा. कारण मला एकट्याला तरी चावी आणायची कुठे हिंम्मत झाली असती.! मी मोबाईलचा टाॅर्च ऑन करून चावी शोधायला लागलो. खुप अंधार असल्यामुळे चावी भेटेल की नाही हा मोठा प्रश्नच होता आमच्या पुढ्यात. तेव्हा " हि घे तुझी चावी पोरा.." -काहिसा घोगरा वाटणारा ओळखीचा आवाज मागच्या बाजूनी अचानक कानावर येवून धडकला. मी मागे वळलो. पहातोय तर काय. हातात चावी घेवून तीच म्हातारी उभी होती.! हो तिच म्हातारी.! जिला थोड्यावेळापूर्वीच ट्रकने चिरडलं होतं. माझ्या तर डोक्याचा पार भुगा झाला होता. नको तसले विचार डोक्यात थैमान घातल्यानंतरच्या दुस-याच मिनिटाला मी बेशुद्धं पडलो. सकाळी जाग आली ती तोंडावर पडलेल्या गरमागरम पाण्याच्या धारेने. तोंडावरून ओघळणारं पाणी पुसण्यासाठी तळहात तोंडाजवळ धरले. पण, घपकन एक उग्र वास नाकाची भगदाडे पार करत पार आतपर्यंत घुसला. हे नक्की कोणाचं काम हे बघण्यासाठी नजर वळवली. तेव्हा बाजूलाच एक हडकुळं कुत्रं जेमतेम शाबूत असलेली शेपूट मोरावाणी डोलवत उभा होता.! जे काय समजायचं होतं ते समजून घेत मी मग तिथेच पडलेला एक दगड उचलला आणि त्याच्या दिशेने दानकन भिरकावून दिला. साला पण माझ्या नेमचा काही नेमंच नाही ना राव. बघा ना, कुत्र्याला मारलेला दगड त्याला नं लागता तिथेच पुढे आडवा पडलेल्या विशालच्या पेकाट्यावर जावून लागला.! त्यामुळे कुत्र्याच्या क्याॅवऽऽ क्याॅवच्या ऐवजी विशालच्या शिव्या ऐकू येवू लागल्या. चला, म्हणजे अख्खी रात्रं खराब गेली पण सकाळची सुरूवात मात्रं कुत्र्याच्या मुताने आणि विशालच्या शिव्याने चांगली झाली होती.!

कपड्यांना चिकटलेली माती झाडत मी आणि विशाल ढांग टाकून सरळ बाईकवर जावून बसलो. ज्या स्पीडने आम्ही काल रात्री इथे आलो होतो त्याच स्पीडने आज इथून निघूनंही गेलो. आधी विशालला त्याच्या घरी सोडलं आणि मग मी माझ्या घरी आलो. तोपर्यंत डोकं पार भनभनून गेलं होतं. रात्रं रस्त्यावरंच काढल्यामुळे अंगसुद्धा जड झालं होतं. त्यामुळे आल्याबरोबर स्वतःला बेडवर झोकून दिलं. डोळे गच्चं मिटले. पण, तरीही झोप काही लागत नव्हती. मग अचानक टिमटती लाईट भक्कन पेटावी तसं माझ्या डोक्यात काहीतरी झालं त्यावेळेस. काही तरी अंधूक असं मला आठवलं. मी तडक बेडवरून उठलो आणि टेबलावर ठेवलेल्या पेपरच्या गठ्ठयामधून एक आठवड्यापूर्वीचा पेपर काढला. पेपर नीट चाळल्यावर आतल्या पानावर तीन जणांची फोटोनीशी एक बातमी दिसली. तिघांचाही फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होता. स्पष्ट काही दिसत नव्हतं. पण, नीट लक्ष देवून बघितल्यावर मला खात्री पटली की, हे फोटो तर ती म्हातारी आणि त्या काका-काकूंचेच होते.! त्या बातमीचा मथळा असा होता- "काल रात्री घडलेल्या भिषण अपघातामध्ये वुद्ध महिलेव्यितिरिक्त एका दांपत्याचा करूण अंत.." हा मथळा वाचताना भितीने अंगावर काटा येत होता. ओठ थरथरत होते. पण, तरीही पूर्ण बातमी वाचण्याचा मोह मला आवरला नाही. ओठांतल्या ओठांत पुटपुटत मी बातमी वाचायला लागलो. "एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकने तीन जणांना चिरडलं. त्यात त्या तिघांचाही जागेवरंच मृत्यु झाला. अपघातामध्ये एक वृद्ध महिला सौ. लक्ष्मीबाई जरांडे (६७) रा. वडेगाव, श्री. प्रमोद भिसे (४२) आणि सौ. कांता भिसे (३७) रा. कोनगाव, ह्यांचा दुदैवी मृत्यु झाला. अपघातामधील दोषी वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्यातरी वाहनचालक फरार असून स्थानिक पोलिस दल त्याचा कसून शोध घेत आहेत." बातमी वाचली आणि हातातला पेपर हातातून कधी गळून पडला हे हातालाही समजलं नाही...!!!


(समाप्त)

लेखक- सतीश रमेश कांबळे.


DMCA.com Protection Status

Saturday, September 9, 2017

असाच एक किस्सा #1

माझ्या मित्राला काही महिन्यांपूर्वी आलेला एक मजेदार अनुभव. अनुभव जरी मजेदार असला तरी त्यामधून एक बोचणारा पण तेवढाच मौलिक संदेश नक्कीच मिळतो. आता तो घेणं नं घेणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

तर.. कामावरून घरी परतत असताना माझ्या मित्राला, तो प्रवास करत असलेल्या रेल्वेच्या डब्ब्यातून जोरदार भांडणाचा आवाज ऐकू आला. नजर देवून पाहिलं तर त्याला दोन तिशीतले तरूण दात-ओठ खात भांडताना दिसले. कदाचित रेल्वेमध्ये चढताना एकाचा चुकून धक्का लागला होता दुस-याला. त्यावरूनंच काय ती त्या दोघांच्यात खडाजंगी सुरू झाली होती. दोघेही हिंदी भाषिक वाटत होते. निदान त्यांच्या हिंदीत चाललेल्या भांडणावरून तरी तसंच वाटत होतं. दोघं भांडणात एकमेकांचा अगदी यथेच्छ उध्दार करत होते.! हा त्याची आई काढतोय, तो त्याचा बाप काढतोय.. कोणीच माघार घ्यायला तय्यार नव्हतं. डब्ब्यातले बाकीचे प्रवासीसुद्धा दिवसभराचा थकवा विसरून त्यांची चाललेली शब्दांची धुमचक्री बघण्यात पार गुंग झाले होते. शेवटी काय तर, दुस-यांचं भांडण म्हणजे आपलं मनोरंजन ही वुत्तीच झाली आहे सर्वांची. असो, तर त्यांचं भांडण क्षणाचीही उसंत नं खाता साधारण असंच पाच दहा मिनिटं सुरू होतं. शेवटी त्यातल्या एकाने आपल्या खिजगणीतून एक शेवटचं पण तितकंच सशक्त हत्यार(मुद्दा) काढलं "भूमीपुत्राचं".. तसं तर हे हत्यार प्रत्येकजणंच स्वतःच्या बचावापुरतं वेळोवेळी वापरत आला आहे. मग हाच मुद्दा पुढे करत तो त्याला उद्देशून इतर प्रवाश्यांकडे नजर फिरवत बोलला,"ये लोग ऐसे ही होते है साले..बाहर सें आते है ईधर और होशियारी करतें है.. साला भैया कुठचा.."(हि एकंच ओळ काय तेवढी ह्या पठ्ठ्याने मराठीत बोलली बुवा..!!) "ये मी नाहीए भैय्या, मराठीच आहे मी", दुसरा पचकन बोलून मोकळा झाला.! दुस-याच्या ह्या उत्तराने मात्र डब्ब्यात क्षणार्धात चिडीचुप शांतता पसरली. ऐव्हाना आपण तोंडावर दनकन आपटलोय हे त्या दोघांच्याही लक्षात आलं होतं.  त्यामुळे त्यांचा चेहरा हा निवडणूकीमध्ये डिपोझिट जप्त झालेल्या एखाद्या नेत्यागत झाला होता..!!एकमेकांकडे खजीलपणे पाहण्याखेरीज आता त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता.  तेव्हा मग शांततेला संपावर पाठवत डब्ब्यामध्ये हसण्याचा भोंगा वाजू लागला. डब्ब्यातील सर्वांचीच हसून हसून पार हालत खराब झाली होती आणि ते दोघे बिच्चारे पुढचं स्टेशन येण्याची वाट चातकाप्रमाणे बघत होते. शेवटी एकदाचं स्टेशन आलं आणि ह्यांनी जराही विलंब नं लावता सरळ डब्ब्यातून धूम ठोकली..!!

तात्पर्य : उगाच नको तिथे हिंदीची लाचारी पत्करून असं चार चौघांत स्वतःचा डब्बा गूल करू नका...!!!

- सतीश रमेश कांबळे.

Friday, July 28, 2017

अनोळखी- एक भयकथा ( 8th Part)

आईच्या आठवणीतंच सकाळ उजाडली.. सर्व आटोपून मी निघण्याची तय्यारी करू लागले.. जास्त लवाजमा सोबत नव्हता घेतला.. दोन जोडी कपडे आणि काही आवश्यक वस्तूच घेतल्या होत्या बॅगेत.. सकाळी अकराच्या आसपास एसटी कुर्ला आगारातून सुटली, ती पंधारवाडीला जाण्यासाठी.. प्रवास साधारण सहा ते सात तासांचा होता.. पण, अर्ध्या वाटेत एसटी बंद पडल्यामुळे पंधारवाडीला पोहचायला खुपंच ऊशीर झाला.. संध्याकाळी सहाला पोहोचणारी एसटी तेव्हा रात्री साडेअकराला पोहोचली होती.. एसटीमध्ये प्रवासीदेखील जेमतेमंच उरले होते.. पंधारवाडी स्टँड आलं आणि मी एसटीमधून उतरले.. त्याकाळी गावात वीज नव्हती.. पण, तरीही त्या स्टँडवर एक विजेचा टिमटिमता दिवा होता.. बाकी एसटी स्टँड वाटावं असं तिथं काहीच नव्हतं.. साधं बसायला एक बाकडाही नव्हता.. मी हातातली बॅग जमिनीवर ठेवणारंच होते की, तेवढ्यात एसटीने माझ्यापासून चाळीस-पंन्नास मीटर अंतरावर जावून करकचून ब्रेक मारला.. एसटी जागच्या जागी थांबली.. धाडकन एसटीच्या पत्र्याचा दरवाजा उघडला आणि आतून चार प्रवासी खांद्यावर अडकवलेल्या भरभक्कम बॅगांसकट खाली उतरले.. त्यांना सोडून ती एसटी निघून गेली.. ही माणसं मुंबईपासूनंच माझे सहप्रवासी होते ह्या एसटीमध्ये.. एसटी जेव्हा वाटेत बंद पडली होती तेव्हा हे चारंही जण इतर प्रवाश्यांशी टवाळकी करत होते.. त्यांच्या वागण्यावरून ते सराईत गुन्हेगारंच वाटत होते.. त्यामुळे हे इथे असे अचानक उतरल्यामुळे सहाजिकंच माझ्या छातीत भितीने धडधडायला लागलं होतं.. माझ्याकडे नजर रोखून ते चौघेही गंभीर चालीने येवू लागले.. त्यांच्या मनात काहीतरी वाईट खदखदतंय ह्याचा अंदाजा मला त्यांच्या हावभावाने एव्हाना आला होता.. ते माझ्या दिशेने सरसावू लागले.. त्या प्रत्येकांच्याच चेह-यावर त्यावेळी एक कावेबाज हास्य खुललं होतं.. पुढचं ओळखून मी स्वतःला सावरत क्षणाचाही विलंब नं लावता तिथून पळ काढला.. ते चौघेही माझा पाठलाग करू लागले.. मी जास्त लांब नाही जावू शकले आणि थोड्याच अंतरावर त्यांनी मला गाठलं.. मी भितीने थरथर कापत होते अन ते नराधम एखाद्या क्रूर राक्षसाप्रमाणे हसत होते.. त्यातल्या एकाने त्याची खांद्यावरची बॅग काढून खाली काढून ठेवली अन पुढे होत माझे कपडे फाडायला लागला.. तश्या बाकीच्यांनीही बॅगा धडाधड जमिनीवर फेकून दिल्या आणि मला ओरबाडायला सुरूवात केली.. तसा त्यांचा हात जोरात झटकून मी कशीबशी तिथून निसटली..!!

ह्या अनपेक्षित घडलेल्या प्रसंगाने मी पूर्णपणे हादरून गेली होती.. भिती तर नसानसांत ऐवढी भिनली गेली होती की, थोड्याच वेळात भोवळ येवून मी तिथेच धाडकन कोसळले.. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा जाणवलं की, माझ्या अंगावर जवळ-जवळ जेमतेमंच कपडे शिल्लक होते.. त्या नराधमांनी त्यांचा डाव साधला होता.. माझ्या अंगात जराही त्राण उरला नव्हता.. डोळेसुद्धा जड झाले होते.. तेव्हा त्या चौघांचाही कुजबूजण्याचा आवाज माझ्या कानात घुमायला लागला.. ते मला मारून टाकायचा बेत आखत होते.. त्यांना हे प्रकरण पोलिसांपर्यंत जावू द्यायचं नव्हतं.. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी होती नव्हती तेवढी सगळी ताकद एकटवून उठून धावत सुटले.. ह्या नराधमांच्या तावडीत जर परत सापडले तर काय होईल ह्या नुसत्या विचारानेच माझ्या मनाचा थरकाप उडाला आणि मग माझ्या पळण्याचा वेगही आपोआपंच वाढला.. शेवटी धावून-धावून मी दमले.. मागे वळून पाहिलं तर ते चौघेही कुठेच दिसत नव्हते.. त्यामुळे थोडी उसंत खावी म्हणून मी थांबले.. लागलेल्या धापांना आवर घालत सहजंच बाजूला नजर टाकली तेव्हा लक्ष्यात आलं की, मी फिरून पुन्हा त्याच एसटी स्टँडवर आले होते..!! तो स्टँड बघून आता डोकं पार चक्रावून गेलं अन मग मी तिथेच हंबरडा फोडून रडू लागले.. त्यावेळेस माझं भानही हरवलं.. अश्यावेळी काय करावं काहीच सुचत नव्हतं.. शरीरानेही साथ द्यायचं टाळलं होतं.. तेव्हा अचानकंच ते चौघेही माझ्या पुढ्यात येवून उभे राहिले, मी तर आता हार मानली होती.. प्रतिकार करण्यासाठी अंगात जराही ताकद उरली नव्हती.. तेव्हा हात जोडत, जीवाची भिक मागत घायाल झालेला माझा जीर्ण देहं तिथेच जमिनीवर पडला.. मग तडक त्यातल्या एकाने माझी केसं पकडून तसंच फरफटंत स्टँडच्या कडेला नेलं.. फरफटल्यामुळे जमिनीवर विखुरलेल्या छोट छोट्या दगडी खड्यांनी माझं शरीर रक्तंबंबाळ झालं होतं.. त्याच अवस्थेत केसं मुठीत गच्चं धरूनंच त्याने मला उठवलं.. मी पडत धडपडत कशीबशी उठले.. पण, तेवढ्यात माझ्या पुढ्यात उभा असलेल्या दुस-या नराधमाने कसलाही विचार नं करता पोटात धारधार सुरा भोसकला.. त्या सु-याच्या घावाने माझं शरीर कळवलं अन एक जोरदार किंकाळी फोडून जमिनीवर तडफडत पडलं.. आता डोळ्यांपुढे ते चौघेही गरागरा फिरायला लागले होते.. माझी शुद्ध हरपली.. पण, तरीही आसपासचा आवाज घंटानादाप्रमाणे कानात घुमायला लागला होता.. माझ्या डोळ्यांची झापड अर्धवट उघडी होती.. त्यामुळे जे काय चालू होतं ते अस्पष्ट का होईना पण दिसत होतं.. अचानकंच बोलता- बोलता सावित्री शांत झाली.. अन क्षणार्धातंच घरात स्मशान शांतता पसरली.. सर्वजण एकमेकांकडे बघायला लागले.. कोणाला काहीच समजत नव्हतं.. तेव्हा मग हळूच तिच्या ईवळण्याचा आवाज घराची शांतता चिरत सर्वांच्या कानावर येवून दणकन आपटला.. तिने तिचं जळालेलं ओठ विस्कटून विद्रुप चेह-यावर उमटवलेलं भयाण हास्य अंगाचा थरकाप उडवत होता.. समीरकडे नजर रोखतंच सावित्री दुडक्या चालीने त्याच्याजवळ आली.. तिच्या डोळ्यांत आता रक्ताचे थेंब अश्रूंच्या स्वरूपात जमू लागले होते.. तिच्या तोंडातून निघणारी गरम वाफ त्याच्या तोंडावर जावून आदळत होती.. जळालेल्या चमडीचा वासही अजून उग्र होऊन घरभर पसरत होता.. डोळ्यांची बुब्बुळं भराभर फिरवत तिने आवंढा गिळून चिडलेल्या अन कर्कश आवाजात बोलू लागली- जिवंतपणीच मला नरकयातना देण्यासाठी त्यातल्या एका नराधमाने जास्त वेळ नं दडवता खिशातून लाईटर काढलं अन माझ्या कपड्याच्या टोकाशी धरलं.. त्या फाटलेल्या तुकड्यासोबतंच माझ्या जीर्ण आणि रक्ताळलेल्या शरीरानेही पेट घेतला.. मी खुपच हतबल झाले होते.. माझ्या शरीरात ओरडण्याइतपतंही अवसान शिल्लक राहिलं नव्हतं.. मुक्यापणे जळत रहाण्याखेरीज मला काहीच करता येत नव्हतं.. मी अगतिक झाले होते..

थोड्या वेळातंच आगीचे चटके गार पडू लागले.. मरणाची वाट बघत असलेल्या माझ्या सोशीक शरीरात अजूनंही जीव बाकी होता.. अर्धवट जळालेल्या माझ्या शरीरामधून मांस जळाल्याचा उग्र वास आणि निघणारा धूर स्टँडभोवती पसरत होता.. पण, त्या निर्दयी लोकांना माझी जराही कीव येत नव्हती.. तश्या अवस्थेतंच त्यांनी मला जवळंच खोदून ठेवलेल्या खड्डयात पुरून टाकलं.. बघता बघता काही क्षणातंच राहिलेल्या सर्व स्वप्नांचा झालेला चुराडा, मागे ठेवून मी माझा प्राण सोडला.. त्यांच्या हसण्याचा क्रूर आवाज हा मी ऐकलेला शेवटचा आवाज ठरला..!!

स्टँडजवळंच टाकलेल्या बॅगा पटापट उचलत ते आता काय करायचं ह्याचा विचार करू लागले.. आता रात्र खुप झाली होती.. त्यामुळे सकाळशिवाय कोणतंही वहान त्यांना मिळणं शक्य नव्हतं... त्याकाळी प्रवासाचं प्रमुख साधन बैलगाडी आणि एसटीच होती.. बैलगाडी ह्यावेळेस भेटणं शक्य नव्हतं अन एसटीची फेरीदेखील दिवसभरातून दोनदाच होती.. पहिली फेरी दुपारी तीनची आणि दुसरी फेरी संध्याकाळी सहाची.. आता पहाटेचे चार वाजत आले होते. थोड्याच वेळात सुर्योदय होणार होता... त्यामुळे स्टँडवर ताटकळत बसण्यापेक्षा त्यांना गावात जाणंच जास्त सोयीचं वाटलं.. जसं जमेल तसं चालत ते गावाच्या वेशीजवळ आले.. वेशीपासून गाव साधारण तीन-चार किलोमीटर लांब होतं.. ईथपर्यंत पोहोचायलाच त्यांना दोन तास लागला होता.. तोवर सुर्यदेखील उगवला होता.. त्यामुळे आजूबाजूचा परिसर आता प्रकाशामध्ये व्यवस्थीतपणे दिसायला लागला.. गावक-यांची आपापल्या शेतावर जाण्यासाठी लगबगही चालू झाली होती.. सारं वातावरण प्रसन्न वाटत होतं.. तेव्हा तिथूनंच बैलगाडी हाकत जाणा-या ग्यानबा नामक गावक-याला ते चौघेही मदतीसाठी अडवतात.. काही तासांपुरती गावामध्ये राहण्याची सोय करायला सांगून त्याबदल्यात त्याला जास्तीचे पैसेही देवू करतात.. पैश्यांच्या हव्यासापोटी त्याने त्या चौघांनाही त्याच्याच एका वापरात नसलेल्या खोपट्यामध्ये नेलं.. तिथेच त्यांना जेवणाचीही सोय करून दिली.. दारू तर त्या चौघांनीही सोबतंच आणली होती.. त्यामुळे त्यांच्या मनासारखं छान जमून आलं होतं.. सर्व आटोपून ते खोपट्याच्या बाहेरंच अंथरून ठेवलेल्या फाटक्या गोणपाटांवर येवून बसले.. आसपास एक फिरती नजर टाकून ते सर्व दारूच्या मैफीलीला सुरूवात करतात.. हे गाव त्यांच्या डोळ्यांना भावलं होतं.. गावाची हिरवळ डोळ्यांत साठवत ते दारूचे घोट रिचवत होते.. ग्यानबाने सर्व व्यवस्था चांगली करून दिली होती.. दारूचा प्याला घश्याखाली उतरवंत ते मैफीलीचा आनंद घेत होते.. आता सुर्यसुद्धा डोक्यावर आला होता.. दारूची धुंदीही त्या चौघांवर चांगलीच चढली होती.. त्यात रात्रभर झोपंही मिळाली नव्हती.. म्हणून नशेतंच ग्यानबाला हाक देवून ते सर्व आवरायला सांगतात.. पण, हाकेला ओ देण्यासाठी तो तिथे नव्हताच.. तो तर केव्हाचाच शेतातल्या कामासाठी निघून गेला होता.. दारूच्या धुंदीत त्यांना ते आठवत नव्हतं.. त्यामुळे एकसारखं ग्यानबाच्या नावाचा जाप त्यांनी सुरू ठेवला होता.. ऐवढा वेळ आवाज देवूनंही तो येत नाही हे पाहून त्यातला एक ग्यानबाच्या नावाने शिव्या हासडणारंच होता की, तेवढ्यात तिथे एक विशीतली तरूणी पायातल्या पैंजणांचा आवाज करत तिथे आली.. तिचं रूप त्या ऊन्हात लखलखंत होतं.. नववारीमध्ये झाकलेलं तिचं अंगं डोक्यावरच्या पदराने आणखीनंच शोभून दिसत होतं.. अश्या ह्या अप्सरेला पाहून त्या चौघांचीही वाईट नजर तिच्या सर्वांगावर रेंगाळते.. हापापलेल्या नजरेने ते तिला न्याहाळू लागतात.. ती मात्र तशीच लाजत, डोक्यावरचा पदर सावरत तिथेच उभी असते.. तेव्हा त्या चौघांपैकी एक स्वतःला सावरत तिला काही बोलाणारंच होता की, ते आधीच ओळखून तिच बोलते- " म्या इंदू.. ग्यानबा धायगुड्यांची ल्योक.. बा ने मला तुम्हासणी काय हव नगं ते संमदं बगायला धाडलंया.." तिच्या ह्या असल्या मादक आवाजाने त्यांना जागच्या जागीच पार घायाळ करून टाकलं होतं.. कोणालाच कशाची शुध्दं नव्हती.. मग ती तशीच पैंजणांचा आवाज करत मटकत त्यांच्या पुढ्यात येवून, रिकाम्या झालेल्या दारूच्या बाटल्या आणि खरकटी भांडी आवरून तिथून आली तशीच निघूनंही जाते.. त्या चौघांच्या डोळ्यांत आता मात्रं तिचीच नशा चढलेली असते.. तिच्या त्या मादक आठवणीतंच ते धुंद होवून तिथेच गोणपाटावर अंगं टाकून झोपी जातात.. रात्री जागरण झाल्यामुळे पडल्या जागी त्यांना गाढ झोप लागते..!!

सायंकाळचे साडेचार वाजत आले होते.. तेव्हा कसल्याश्या तरी आवाजाने त्यातल्या एकाला जाग आली.. डोळे चोळतंच तो आजूबाजूला नजर फिरवतो.. त्यासरशी छमम छमम पैंजणांचा आवाज करत इंदू त्याच्या पुढ्यात येवून उभी रहाते, तशी ह्याच्या ओठांची पाकळी खुलते.. " पावणं, आता दिस मावळाया लागलाय.. तवा तुम्हासणी स्टँडपतुरचा परवास तासाभरात पुरा करायचा आसल तर, आसं गावाला हेलपाटा मारून नका जावु.. म्या सांगतेया त्या वाटेनी जावा, लगीच तासाभरात स्टँडवर पोहचाल.." तिच्या ह्या मादक आवाजातलं बोलणं ऐकून तो हुळरून जातो.. तसाच जाग्यावर उभा राहून तो नुसतं तिला न्याह्याळाला लागतो.. त्याचं न्याह्याळणं चालूच असतं पण ती पटकन जावून अगोदरंच सोय करून ठेवलेली बैलगाडी खोपट्याजवळ घेवून येते.. बैलांच्या घुंगरांच्या आवाजाने इतर तिघांनाही जाग येते.. तेव्हा त्यांचा पहिला मित्र राजेश त्यांच्याकडे वळत बोलतो, "बघा मित्रांनो, इंदूने आपल्याला स्टँडवर जाण्यासाठी ह्या बैलगाडीची सोय केली आहे.." राजेशच्या बोलण्याने तिघेही चकीत होतात.. कारण, त्यांना बैलगाडी तर दिसत होती पण इंदू कुठेच दिसत नव्हती..!!
"काय झालं रे..? असे का बघताय.?" मित्रांना गोंधलेलं पाहून राजेश विचारतो..
" बैलगाडी तर दिसतेय पण, इंदू कुठेय.?" सागर आश्चर्याने विचारतो..
"अरेरे, हि काय इंदू बैलगाडीजवळंच तर उभी आहे " असं बोलत राजेश मागे नजर वळतो.. त्यासरशी त्याला एक जोरदार धक्का बसतो.. कारण, तिथे नुसती बैलगाडीच उभी होती.. इंदू तर आसपास कुठेच दिसत नव्हती..!! काही सेकंदापुर्वीच तर ती इथे होती मग आता ऐवढ्या लगेच अशी कशी काय गायब झाली..? राजेश स्वतःच्याच मनाला विचारू लागतो.. शेवटी स्वतःचीच समजूत काढत, गेली असेल घरी असं मनाला पटवून देत तो ह्या विषयाला बगल देतो.. आता पाच वाजत आले होते.. त्यामुळे पटापट आवरून ते गाडीत येवून बसायला लागतात.. तेव्हा "अरेरे.. पण, बैलगाडी हाकणारा कुठेय.? इंदूने तर नुसती बैलगाडीच दिली आहे. गाडीवान कुठेय.? " त्यातला तिसरा नराधम वसंत खिजगणीतून सुटलेल्या समेस्येकडे सर्वांचं लक्ष्य वेधतो.. " गाडीवान हवाय व्हय.? मग म्या कोण हाय.?" एक भारदस्त आवाज अचानक त्यांच्या कानावर दनकन येवून आदळतो..!!

क्रमश:

लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh


DMCA.com Protection Status