About Us

पल्ल्याड मन...

मनाला ना ही कसलं बंधन असतं ना ही कसल्या सीमा.. ते तर त्याला हवं तसं आणि हवं तिथे हुंदडत असतं अगदी बिनधास्त होवून..!! मनसोक्त हिंदडण्यासाठी ना त्याला पैश्यांची गरज असते, ना कुठल्याही वाहनांची... आलं मनात अन गेलं रानात ह्या उक्तीप्रमाणे त्याचं चाललेलं असतं.. कधी माणसाचं मन त्याला अल्लड होवून लडीवाळ चाळे करायला लावतो.. तर कधी सामंजसपणा दाखवत तुटणारं नातं टिकवायला भाग पाडतो.. कधी तो बालिश बनून लहानग्यांच्या पंगतीत जावून बसतो.. तर कधी तो विचारांची सुंदर माळ गुंफत लेखक अन कवी बनतो...!!!

एकवेळ माणसाचा स्वभाव ओळखणं सोप्प काम असेल पण त्याच्या मनाचा स्वभाव ओळखणं खुपंच अवघड असतं.. मनाचा स्वभावंच खुप वेगळा.., त्याला असं एका ठराविक चौकटीत बांधताच नाही येणार.. कोणाचं अल्लड असतं तर कोणाचं लडीवाळ.. पण काही का असेना, शेवटी मन रमतं ते वेगळ्याच दुनियेत.. स्वप्नांच्या.. कल्पनेच्या विश्र्वात ते सहज रमतं..!! पण, जे मन कल्पनेच्याही पलीकडे जातं कदाचित त्यालाच " पल्ल्याड मन " बोलत असावं.. आणि ह्याच मनाचा शोध आम्ही ह्या ब्लाॅगमधून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय.. तुमच्या मदतीने आणि तुमच्या सोबत..

मग येणार ना कल्पनेच्या पलीकडे .. एका पल्ल्याड मनाच्या विश्र्वात...!!!


DMCA.com Protection Status

No comments:

Post a Comment