Saturday, March 22, 2025

गुलसत - भाग 1



दुपारची वेळ होती.. थंडीचा महिना असल्यामुळे भर उन्हातही अंग थंडीनं शहारत होतं.. करन तिथेच रस्त्याकडेच्या धाब्यावर जेवायला बसला होता..गालातल्या गालात हसत..कसल्याश्या तरी विचारात स्वतःला हरवत, स्वतःच्याच तंद्रीत तो जेवणाचा आस्वाद घेत होता.. त्याचं हे थोडं असं वेगळं वागणं त्याच्याच पुढे काही अंतरावर बसलेला एक पन्नाशीतील वयस्क व्यक्ती कुतूहलाने पहात होता.. बराच वेळ करनचं असं वागणं, गालातल्या गालात हसणं ह्याने ती वयस्क व्यक्ती नं रहावून शेवटी करनजवळ जावून काही विचारायच्या मुद्रेने उभी रहाते..!! आपल्या पुढ्यात अचानक कोणीतरी येवून उभं राहिलं आहे हे जाणवल्याने, करन त्याच्या तंद्रीतून बाहेर येतो आणि त्या व्यक्तीच्या दिशेने पाहून बोलतो, " तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे का.?? " - करन बोलला, पण त्या माणसाला काहीच कळालं नाही की नक्की करन काय बोलला ते.. कारण कळायला मुळात तो माणूस भारतीय नव्हताच..!! तो तर आला होता आपल्या शेजारील देशातून..पाकिस्तानातून..!! त्यामुळे करनचं मराठीतलं बोलणं त्याच्या डोक्यावरून गेलं होतं..

" जनाब..माफी चाहता हुॅं, पर आप अभी क्या बोले मुझे समझ नहीं आया। पर बहुत वक्त से में आपको देख रहा हुॅं..आप अपने आप में ही खुश हुए जा रहे हो..खुद के खयालों में ही खोए हुए हो। तो मुझे रहा नही गया और में आप से पूछने चला आया " - तो माणूस बोलता झाला..

करनला त्या माणसाची आपल्याबद्दल जाणून घेण्याची ओढ जाणवली, आणि त्याने त्या माणसाला अगदी सहजपणे उत्तर दिलं, " में मेरी खुशी की वजह किसी और में नहीं ढूंढता और ना ही खुशी को ज्यादा इंतज़ार कराता हुॅं। में बहुत महीने पहले से ही "बाईक राइड" पर जाने के बारे में सोच रहा था। काम की वजह से जा नहीं पा रहा था। पर अब मौका मिला है तो निकल पड़ा हुॅं मेरी जिन्दगी जीने..!! और यही सोचकर में मन ही मन खुश हो रहा था के, ना जाने आगे अनजाने रास्तों पर कितने हसीन पल और मोड़ आनेवाले है मेरी जिन्दगी में। और वैसे भी, अनजाने रास्तों पर चलने का मज़ा पहचाने रास्ते कहा दे पाते है।। " वाक्याच्या शेवटी डोळा मारत करनणे एक फिल्मी डायलॉग चीपकुन दिला..!!



तो माणूस करनचं बोलणं ऐकून भलताच खुश होतो.. त्याला बघायला गेलं तर कारणही तसंच होतं.. हा माणूस पाकिस्तानहून आपल्या भारतात एक महिन्याच्या visitor visa वर, भारत भ्रमंती करायला आला होता.. त्याला आपला देश बघायचा होता खरा, पण टीपिकल टूर गाईड्सच्या ठरलेल्या रोड मॅपने नाही, तर स्वतःच फिरत फिरत जिथे मन करेल तिथे जायचं होतं त्याला..!! आणि त्यासाठी तो, जो रस्त्यात गाडीवाला किंव्हा बाईकवाला भेटेल त्याला लिफ्ट मागत होता, आणि असं करत करत तो कसा बसा गेला एक आठवडाभर फिरत होता..!! ज्या शहरात त्याला लिफ्ट देणारी व्यक्ती सोडत असे, त्याच शहारत तो त्या दिवसापूरता राहून पूर्ण शहर फिरून घेत होता.. बस, टॅक्सी, रिक्षा..जे मिळेल ते पकडुन, जेवढं बघता येईल, फिरता येईल, ज्या फेमस डिशेस आहेत ते खाता येईल तेवढं खात होता, आणि मग रात्री एखादं हॉटेल बुक करून पूर्ण रात्र तिथेच काढत होता.. हा त्याचा दिनक्रम एक आठवडा सलग चालला होता. पण आता यापुढे असं करून चालणार नाही, हे त्याला जाणवलं होतं.. ह्याला त्याला लिफ्ट मागून केलेल्या प्रवासात खूप वेळ वाया जात होता. लिफ्ट मागताचक्षणी त्याला कोणी लिफ्ट देत होतं असं नव्हतं.. कधी अर्धा तास तर कधी तासनतास वाट बघावी लागत होती.. आणि त्यातच परका देश, परकी माणसं ह्यामुळे साहजिकच कोणालाही थोडं असुरक्षित वाटणं आलंच.. त्याबरोबरंच नक्की कुठे जायचं.?? काय बघायचं.?? हे जमवताना त्याला तारेवरची कसरत करावी लागत होती.. ह्यामुळे करन जेव्हा बाईक राईडबद्दल बोलला, तेव्हा त्याला साक्षात देवंच भेटल्यागत झालं होतं..!! 


त्याने मनोमन ठरवून टाकलं होतं की, आता यापुढचा जो पण प्रवास असेल, तो आपण करनसोबतंच करायचा..!!

" क्या हुआ अंकल.?? किस सोच में खो गए आप.?? " करनने अचानक विचारलेल्या प्रश्नाने तो माणुस भानावर आला.. " नहीं नहीं बेटा..में यूंही सोच रहा था के, अगर आपको कोई दिक्कत ना हो तो, क्या में भी आप के साथ बाईक राइड पर चल सकता हूं क्या.?? तो अगदी ओशाळलेल्या नजरेने करनला विचारतो.. करन ते समझतो, आणि आपल्यासोबत राईडला घेवून जाण्यासाठी मान हलकीच वर खाली करून होकार दर्शवतो.. करनच्या होकाराने तो माणूस खूप खुश होतो..


दोघेही जेवण आटोपतात आणि करनच्या बाईकजवळ येतात. करनची बाईक ही सफेद कलरची Avenger 220 cruise bs6 मॉडेलची होती.. त्यात त्याने थोडं modification ही करून घेतलं होतं..!! मागे सामान ठेवायला बॉक्स बसवून घेतला होता.. रात्रीचं व्यवस्थित दिसावं ह्यासाठी त्याने फॉग लाईट्स लावून घेतल्या होत्या.. लाँग राईडसाठी जी तय्यारी करायला हवी होती, ती त्याने चोख केली होती..!! बराच वेळ ती वयस्क व्यक्ती करनच्या बाईकला कुतूहलाने न्याहाळत होती.. एव्हाना करनच्या हे लक्ष्यात आलं होतं.. " क्या हुआ अंकल.?? ऐसी बाईक पहले कभी देखी नहीं क्या.?? - करन मस्करीमध्ये त्या व्यक्तीला बोलतो.. " देखी है, पर बहुत कम.. पर आप के हिंदुस्तान में तो हर तरफ ही, बहुत ही लाज़वाब बाईक्स आते जाते नजरों पर पड़ती रहती है.. हमारे यहाँ तो अभी तक 30 साल पुराने बाबा आदम की बाईक्स के मॉडल चल रहे हैं रास्तों पर..!!" - ती व्यक्ती थोडी हताश होवून बोलते. " हमारे यहाँ.?? में कुछ समझा नहीं अंकल.." - करन गोंधळलेल्या स्वरात त्या व्यक्तीला विचारतो. " हा, हमारे यहाँ.. में दरअसल पाकिस्तानी हुं..!! आप के हिंदुस्तान घूमने आया हुं इक महीने के लिए..!!" त्याने आपण कुठून आणि कशासाठी आलोय हे सांगितल्यावर त्याला वाटलं की, करन हमखास आता आपल्याला त्याच्यासोबत येण्यास मनाई करेल. त्यामुळे थोडं आता ती व्यक्ती ह्या विचाराने चिंतेत आली होती.. आपण चूक तर केली नाही ना आपण पाकिस्तानी आहोत हे सांगून.?? ती व्यक्ती बराच वेळ चिंतेत नको ते विचार करायला लागली.. करन त्याला असं थोडं चिंतेत पडलेलं बघून हसायला लागतो.. " अर्रे अंकल..टेंशन मत लो.. आप पाकिस्तानी हुए तो क्या हुआ, हो तो अभी हमारे हिंदुस्तान के मेहमान ही ना..!! और ' अतिथि देवो भवाः ' ही हमारे देश की परंपरा है.. तो ज्यादा उलटा सोचो मत.. और आगे आपकी जितनी भी उलटी सोच है, वो सब बदलनेवाली है..!! - करन चेहऱ्यावर स्माईल आणत बाईकवर बसतो, व त्या व्यक्तिलाही बसायला सांगतो..


आणि मग त्या दोघांच्या एका अविस्मरणीय प्रवासाला सुरुवात 

होते..!!! 


क्रमशः

लेखक : सतीश रमेश कांबळे.

DMCA.com Protection Status

No comments:

Post a Comment