संपले हुंदके ते कधीचं आसवांचे
जे माझेचं मला रोखण्या आसुसले होते..
तोडले पाश ते कधीचं बंधनांचे
जे मागे खेचण्या उगाचं दंग होते..
नकोतं पुन्हा ते स्वप्नांचे डोहाळे
आधीचं केवढे ते ऊराशी ढीग होते..
करण्या उजेडाची ती कधीचं सोडली तमा
फाटलेल्या झोळीत आज माझ्या कित्तेकं तारे होते...
कवी :- सतीश रमेश कांबळे.

No comments:
Post a Comment