Friday, June 16, 2017

नातं... ( कविता )

काट्यांमधूनी चालताना काटे
पायांमध्ये रूतणारंच..

नात्यांमध्ये राहून नाते
कधी ना कधी खुपनारंच..

आपणंच असतो आपलं ह्याजगी
हे आज ना उद्या कळणारंच..

दिखाव्याची दुनिया ही सगळी
मुखवटे कधीतरी पडणारंच..

सारेच हात मदतीचे नसतात
वाट चुकल्यावर कळणारंच..

सा-याच वाटा परतीच्या नसतात
दूर गेल्यावर मन सांगणारंच..

स्वप्नांतूनी स्वप्नं रंगवताना 
स्वप्नं एखादं तरी भंगणारंच..

आपणंच असतो आपलं ह्या जगी,

आज ना उद्या कळणारंच..
आज ना उद्या कळणारंच..

 कवी :- सतीश रमेश कांबळे.


DMCA.com Protection Status

1 comment: